जळगावात दोन तरुणांच्या आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 01:21 PM2017-08-02T13:21:57+5:302017-08-02T13:24:57+5:30
तरुणाने गावाबाहेर झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या
आॅनलाईन लोकमत,
जळगाव,दि.२ - तालुक्यातील कानळदा येथे रात्री तमाशा पहायला गेलेल्या प्रशांत शामकिरण सपकाळे (वय १८ ) या तरुणाने गावाबाहेर झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी साडे सहा वाजता उघडकीस आली आहे. तर त्यानंतर पुन्हा दुसरी घटना शहरातील हर्षवर्धन कॉलनीत अरुण प्रभाकर महाजन (वय ३७) या तरुणानेही राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली. या दोन्ही घटना तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्या असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कानळदा येथे मंगळवारी मरी आईचा यात्रोत्सव होता, त्यानिमित्ताने गावात तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री आठ वाजता प्रशांत घरी असताना त्याला कोणाचा तरी फोन आला व तो लगेच घरुन बाहेर गेला. बुधवारी सकाळी गावाबाहेर नांद्रा रस्त्याला एका झाडावर गळफास घेतल्याच्या अवस्थेत त्याचा मृतदेह लटकलेला दिसला. शौचास गेलेल्या वामन भाऊराव सोनवणे यांना प्रशांतचा मृतदेह आढळला.