तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात तरुणाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 03:32 PM2020-07-23T15:32:06+5:302020-07-23T15:33:39+5:30

मेहरुण तलावात मृतावस्थेत आढळून आलेल्या १७ वर्षीय तरुणीच्या प्रकरणात विशाल संतोष भोई (२१, रा.रामेश्वर कॉलनी) याला रामानंद नगर पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी न्यायालयाने त्याला २८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, विशाल याने तरुणीला गणपती नगरातून पळवून नेण्यासह कोल्हे हिल्स बंगल्याच्या परिसरात नेल्याचेही उघड झाले असून पोलिसांकडे तसे पुरावेही मिळून आलेले आहेत.  

Young man arrested in suicide case | तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात तरुणाला अटक

तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात तरुणाला अटक

Next
ठळक मुद्देसहा दिवस कोठडीकोल्हे हिल्स परिसरातही फिरविले

जळगाव : मेहरुण तलावात मृतावस्थेत आढळून आलेल्या १७ वर्षीय तरुणीच्या प्रकरणात विशाल संतोष भोई (२१, रा.रामेश्वर कॉलनी) याला रामानंद नगर पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी न्यायालयाने त्याला २८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, विशाल याने तरुणीला गणपती नगरातून पळवून नेण्यासह कोल्हे हिल्स बंगल्याच्या परिसरात नेल्याचेही उघड झाले असून पोलिसांकडे तसे पुरावेही मिळून आलेले आहेत.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांबापुरात राहणारी तरुणी व तिची आई रविवारी दि.१९ रोजी सकाळी ११ वाजता गणपती नगरातील रोहीत मनोहरलाल नाथानी यांच्याकडे धुणीभांडी करायला गेले होते. तेथील सीसीटीव्ही कॅमेºयातील रेकॉर्ड व प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या म्हणण्यानुसार ही तरुणी विशालसोबत गेली होती. त्यानंतर नाथानी यांच्याकडेच काम करणाºया हरिविठ्ठल नगरातील एका महिलेला ही तरुणी कोल्हे हिल्स परिसरातील बंगल्याकडे दुपारी चार वाजता विशालसोबत दिसली होती. त्यानंतर सोमवारी सकाळी ती मेहरुण तलावात नातेवाईकांना मृतावस्थेत आढळून आली. तरुणीने त्याच दिवशी तलावात आत्महत्या केल्याचा संशय असून त्याला विशाल हाच जबाबदार असल्याने त्याच्याविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अपहरणाच्याच गुन्ह्यात दोन कलम वाढविले 
 दरम्यान, १९ रोजीच या प्रकरणात तरुणीला फूस लावून पळविले म्हणून अज्ञात व्यक्तीविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता, त्यात आता विशाल याला आरोपी करण्यासह वाढीव ३०६ व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियिम २०१२ चे कलम १२ चे कलम (पोक्सो) लावण्यात आले. चौकशीत आणखी कलम वाढण्याची शक्यता आहे. त्याची वैद्यकिय तपासणी केली जाणार असून यात आणखी कोणाचा सहभाग होता का याचीही चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी विशाल याला न्या.एस.जी.ठुबे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला २८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी बाजू मांडली. दरम्यान, विशाल हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुध्द यापूर्वी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Young man arrested in suicide case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.