पोलिसांना बातम्या पुरविल्याच्या संशयावरून तरुणाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:11 AM2021-05-03T04:11:19+5:302021-05-03T04:11:19+5:30

तिघांना अटक : पोलीस कोठडी जळगाव : पोलिसांना बातम्या पुरवल्याच्या संशयावरून अमोल सुकलाल भोई २४ चौक या तरुणास तिघांनी ...

Young man beaten on suspicion of passing news to police | पोलिसांना बातम्या पुरविल्याच्या संशयावरून तरुणाला मारहाण

पोलिसांना बातम्या पुरविल्याच्या संशयावरून तरुणाला मारहाण

Next

तिघांना अटक : पोलीस कोठडी

जळगाव : पोलिसांना बातम्या पुरवल्याच्या संशयावरून अमोल सुकलाल भोई २४ चौक या तरुणास तिघांनी लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याची घटना २७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता पिंप्राळा परिसरातील मढी चौकात घडली होती. मारहाण करणाऱ्या विशाल भिका कोळी (२४), अक्षय ऊर्फ बाब्या धोबी (वय २०, दोन्ही रा. कोळीवाडा पिंप्राळा) व सचिन अभयसिंग चव्हाण (२०, रा. शंकर आप्पानगर) या तिघांना काल शनिवारी रात्री अटक करण्यात आली. तिघांना रविवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल भिका कोळी, बाबुलाल धोबी (रा.वाडा पिंप्राळा) व सचिन चव्हाण (रा. शंकर आप्पानगर) या तिघांनी २७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता अमोल सुकलाल भोई याला मढी चौकात जाऊन ’तू पोलिसांना बातम्या पुरवितो’, असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. विशाल याने लाकडी दांडा मारल्यामुळे त्याचा हात फ्रॅक्चर झाला, यानंतर तिघांनी अमोलच्या घरी जाऊन त्याच्या आईवडिलांना ’तुमच्या मुलाला आवरा नाही तर हातपाय तोडून हातात देईन’, अशी धमकी भरली. याप्रकरणी ३० रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रामानंदनगर गुन्हे शोध विभागाच्या पोलीस नाईक विनोद सोनवणे, शिवाजी धुमाळ, चालक संतोष पाटील यांच्या पथकाने पिंप्राळा गावठाण भागातून तिघांना अटक केली. त्यांना रविवारी न्यायालयात हजर केले असता, तिघा संशयिताना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास हवालदार सतीश डोलारे करीत आहेत.

Web Title: Young man beaten on suspicion of passing news to police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.