टीव्ही विक्रीचा व्यापारी सांगून तरुणाची साडेतीन लाखाने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:16 AM2021-05-14T04:16:18+5:302021-05-14T04:16:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : टीव्ही विक्रीचा व्यापारी असल्याचे भासवून संदीप सुभाष महाजन (वय ३२, रा. सिद्धिविनायक शाळेजवळ, अयोध्यानगर) ...

Young man cheated of Rs 3.5 lakh by claiming to be a TV sales trader | टीव्ही विक्रीचा व्यापारी सांगून तरुणाची साडेतीन लाखाने फसवणूक

टीव्ही विक्रीचा व्यापारी सांगून तरुणाची साडेतीन लाखाने फसवणूक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : टीव्ही विक्रीचा व्यापारी असल्याचे भासवून संदीप सुभाष महाजन (वय ३२, रा. सिद्धिविनायक शाळेजवळ, अयोध्यानगर) या तरुणाची नागपूरच्या चार जणांनी साडेतीन लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. याप्रकरणी गुरुवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप सुभाष महाजन यांची एमआयडीसीतील सदगुरू नगरात श्रद्धा इंटरप्रायझेस नावाची कंपनी आहे. संदीप महाजन यांनी ऑनलाईन इंडिया मार्ट म्हणून इंटरनेट सर्च केले. ११ मे रोजी दुपारी १२ वाजता नागपूर येथील इमस्पेक्सिया सोर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या काही सदस्यांनी संदीप महाजन यांच्याशी संपर्क साधला. कंपनीच्या माध्यमातून टीव्ही विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे महाजन यांना भासवले. त्यानुसार बनावट नावे असलेल्या अश्विन अजय सोमकुंवर आणि लता अजय सोमकुंवर (रा. आयटी पार्क रोड, गायत्री हॉटेलच्या समोर नागपूर) यांनी संदीप महाजन यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार महाजन यांनी नागपूर येथील आकृती अग्रवाल आणि सिद्धार्थ पटेल यांनी व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून व्यवहार करण्याबाबत चॅटिंग सुरू केले. ८३ टीव्हीची ७ लाख रुपयांची ऑर्डर दिली. ऑर्डर बुक केल्यानंतर ५० टक्के रक्कम साडेतीन लाख रुपये महाजन यांनी दिलेल्या बँक अकाऊंटमध्ये टाकले. यात ५ वाजता १ लाख, ७.३० वाजता ५० हजार आणि ८ वाजता २ लाख, असे ३ लाख ५० हजार रुपये ऑनलाईन पाठविले. संदीप महाजन यांचे ओळखीच्या काही व्यक्ती नागपूर येथे असल्यामुळे ऑर्डर घेण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर पाठविले. मात्र दिलेला पत्ता चुकीचा असल्याचे समोर आले, तर दुसरीकडे नागपूर येथील दोघांचे मोबाईल नंबर बंद झाले. महाजन यांनी वारंवार फोन लावून संपर्क होऊ शकला नाही. बुधवारी सकाळी १० वाजतादेखील पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु काही उपयोग झाला नाही. दरम्यान, आपली फसवूणक झाल्याचे महाजन यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने एमआयडीसी पोलिसात धाव घेतली. संदीप महाजन यांच्या फिर्यादीवरून नागपूर येथील चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार अतुल वंजारी करीत आहेत.

Web Title: Young man cheated of Rs 3.5 lakh by claiming to be a TV sales trader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.