रेल्वे रुळावर झोपून तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:19 AM2021-03-01T04:19:10+5:302021-03-01T04:19:10+5:30

जळगाव : असोदा रेल्वेगेट परिसरात एका अनोळखी २५ वर्षीय तरुणाने रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी ...

Young man commits suicide by sleeping on railway tracks | रेल्वे रुळावर झोपून तरुणाची आत्महत्या

रेल्वे रुळावर झोपून तरुणाची आत्महत्या

Next

जळगाव : असोदा रेल्वेगेट परिसरात एका अनोळखी २५ वर्षीय तरुणाने रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत तरुणाच्या शरीराचे दोन तुकडे झाले आहेत. त्याच्या खिशात फोटो, पाकीट व रुमाल आढळून आला आहे, मात्र नाव व पत्ता याबाबत काहीच माहिती नसल्याने तरुणाची ओळख पटू शकलेली नाही.

असोदा रेल्वेगेट येथे रेल्वे रुळावर शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास तरुणाने आत्महत्या केल्याबाबत माहिती रेल्वे स्टेशन मास्तरकडून शनीपेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे, अंमलदार प्रमोद पाटील व अमित बाविस्कर यांनी घटनास्थळ गाठले असता खांब क्र.४२१/२१ ते ४२१/२० या दरम्यान रुळावर शरीराचे दोन तुकडे झालेले आढळून आले. तुकड्यांच्या बाजूला चप्पल होती तर खिशात रुमाल व पाकीट होते. त्यात फोटो होते. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी दोन्ही तुकडे जिल्हा रुग्णालयात आणले. फोटो व चप्पलवरून पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख पटविण्याचे आवाहन केले, मात्र रात्री उशिरापर्यंत ओळख पटलेली नव्हती. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Young man commits suicide by sleeping on railway tracks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.