तरूणाची रेल्वेखाली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 08:30 PM2020-08-07T20:30:01+5:302020-08-07T20:30:17+5:30
जळगाव : खंडेराव नगरातील ३५ वर्षीय तरूणाने नैराश्यातून स्वत:ला धावत्या रेल्वेखाली झोकून देवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस ...
जळगाव : खंडेराव नगरातील ३५ वर्षीय तरूणाने नैराश्यातून स्वत:ला धावत्या रेल्वेखाली झोकून देवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रमेश दगडू भोई (रा. नशिराबाद, ह.मु.खंडेराव नगर, जळगाव) असे मयताचे नाव आहे़
रमेश हा खंडेराव नगरात कुटूंबीयांसह वास्तव्यास होता़ शेंगदाणे व फुटाणे विकण्याचे काम करून कुटूंबीयांचा उदरनिर्वाह करायचा़ दरम्यान, पती-पत्नीत कौटूंबिक वाद झाल्यामुळे पत्नी ही मुलासह माहेरी निघून गेली़ त्यामुळे खंडेराव नगरात आई कमलाबाई वडील दगडू भोई आणि भाचा अभिजित भोई यांच्यासोबत रमेश हा राहत होता़ गेल्या चार ते पाच वर्षांपासून पत्नी माहेरी गेल्याने नैराश्येतून रमेश हा गुरूवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास घराबाहेर पडला़ खूप वेळ झाल्यामुळे मामा घरी न आल्याने भाचा अभिजित याने रात्रभर शोधाशोध सुरू केली़ परंतु, मामा कुठेही दिसून आला नाही़ दरम्यान, शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास जळगाव -शिरसोली दरम्यान रेल्वे डाऊन खंबा क्रमांक ४२४ ते ४२६ दरम्यान रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी रामांनद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्राथमिक तपास पो.कॉ. विश्वनाथ गायकवाड करीत आहेत.