तरूणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 09:15 PM2021-01-15T21:15:22+5:302021-01-15T21:15:34+5:30
जळगाव : शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या राकेश हिंमत जाधव (२४, रा. विटनेर, ता. जळगाव ) या तरूणाचा विजेचा शॉक ...
जळगाव : शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या राकेश हिंमत जाधव (२४, रा. विटनेर, ता. जळगाव) या तरूणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास विटनेर शिवारात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राकेश जाधव हा तरूण गॅरेज चालवून व सोबत शेती करून कुटूंबियांना उदरनिर्वाहात हातभार लावायचा. शुक्रवारी सकाळी राकेश हा शेतात पाणी भरण्यासाठी गेला होता. सुमारे ११.१५ वाजेच्या सुमारास पाण्याची मोटार सुरू करत असताना त्याचा विजेचा जोरदार धक्का लागला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार ग्रामस्थांना व कुटूंबियांना कळताच त्यांनी त्यास जिल्हा रूग्णालयात वाहनातून हलविले. तपासणीअंती त्यास वैद्यकीय अधिका-यांनी मृत घोषित केले. राकेश याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मोठा भाऊ, वहिणी असा परिवार आहे.