पुरात वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 03:11 PM2020-09-24T15:11:40+5:302020-09-24T15:11:55+5:30

मुडी- वालखेडा पुलावरील घटना

Young man dies in flood | पुरात वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू

पुरात वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू

Next


अमळनेर : आजीच्या गावावरून परस्पर नोकरीच्या ठिकाणी येणाऱ्या तालुक्यातील पिळोदा येथील दीपक नाना पारधी (२८) या वायरमनचा पांझरा नदीच्या पुरात वाहून गेल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना २४ रोजी सकाळी७ वाजेच्या सुमारास मुडी- वालखेडा पुलावर घडली
दीपक हा तालुक्यातील देवळी येथे वायरमन म्हणून एमएसईबी मध्ये काम करत होता. तो २३ रोजी दुपारी ४ वाजता त्याच्या आजीला बुरझड ता. साक्री जि धुळे येथे भेटण्यासाठी गेला होता. २४रोजी सकाळी तो आपल्या कर्तव्यावर येण्यासाठी मोटरसायकलने परत येत असताना मुडी ते वालखेडा दरम्यान असलेल्या पुलावर पांझरा नदीला पूर आल्याने पाणी वाहत होते तरी देखील दीपकने मोटरसायकल काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा तोल जाऊन मोटासायकल पुलाच्या दगडावर अडकून पडली परंतु दीपक पाण्यात वाहून गेला. मुडी येथील प्रवीण कोळी व इतरांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले मात्र तो मयत झालेला होता. या घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Young man dies in flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.