गरबा खेळतांना हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू
By चुडामण.बोरसे | Published: October 4, 2024 11:35 AM2024-10-04T11:35:30+5:302024-10-04T11:35:50+5:30
हा प्रकार लक्षात येताच मंडळातील तरुणांनी त्याला खासगी हाॕस्पीटलमध्ये आणले. तेथील डाॕक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पाचोरा (जि.जळगाव) : गरबा खेळताना २७ वर्षीय युवकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना पाचोरा (जि. जळगाव) येथे गुरुवारी रात्री ११.३०वाजता घडली.
लखन रमेशलाल वाधवानी असे या मृत युवकाचे नाव आहे. तो शहरात गुरुवारी रात्री एका दुर्गौत्सव मंडळात गरबा खेळत होता. त्याचवेळी त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो खाली कोसळला. हा प्रकार लक्षात येताच मंडळातील तरुणांनी त्याला खासगी हाॕस्पीटलमध्ये आणले. तेथील डाॕक्टरांनी त्याला मृत घोषित केले.