अत्यवस्थ अवस्थेतील बगळ्याला तरुणांनी दिले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:19 AM2021-08-29T04:19:12+5:302021-08-29T04:19:12+5:30
महिंदळे, ता. भडगाव : येथे बस स्टॅन्ड परिसरात पिंपळाच्या झाडावर अनेक बगळ्यांचे वास्तव्य रोज रात्री असते. दिवसभर अन्नाच्या शोधात ...
महिंदळे, ता. भडगाव : येथे बस स्टॅन्ड परिसरात पिंपळाच्या झाडावर अनेक बगळ्यांचे वास्तव्य रोज रात्री असते. दिवसभर अन्नाच्या शोधात फिरून बागडून या पिंपळाच्या झाडावर रात्रभर आराम करतात व सकाळी पुन्हा अन्नाच्या शोधात निघून जातात. परंतु एक बगळा तेथेच राहिला. काहीतरी विषारी अन्न खाल्ल्यामुळे तो झाडावरच बसून होता. दुपारी अचानक तो झाडावरून पडला व अत्यवस्थ झाला.
अशीही भूतदया
झाडावरून एक बगळा खाली पडला. त्याला उडता येत नसल्यामुळे कुत्रे त्याच्यावर झडप भरणार तोच परिसरातील तरुणांनी त्याला सुरक्षित स्थळी नेऊन पाणी पाजले व त्वरित गावातील पशुवैद्यक डॉ. पृथ्वीराज देवरे यांना बोलवून त्याच्यावर उपचार केले. तो तंदुरुस्त होत नाही, तोपर्यंत सांभाळून त्याला मोकळ्या रानात सोडले. यावेळी पत्रकार भास्कर पाटील, बंडू पवार, राजेंद्र देवरे, रावसाहेब देवरे, नाना पाटील, माणिक पाटील यांनी या मुक्या प्राण्याचा जीव वाचवण्यात मदत केली.
280821\28jal_3_28082021_12.jpg
गंभीर अवस्थेत असलेल्या बगळ्यावर उपचार करताना डॉ. पृथ्वीराज देवरे.