पत्नी, मेहुणीसह इतरांचे नावे लिहून तरुणाने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:15 AM2021-01-17T04:15:03+5:302021-01-17T04:15:03+5:30

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामचंद्र उर्फ भुरा देवराम (माळी) महाजन हा तरूण गेल्या सहा महिन्यांपासून सुरत येथे पत्नी निकिता व ...

The young man took the gallows by writing the names of his wife, sister-in-law and others | पत्नी, मेहुणीसह इतरांचे नावे लिहून तरुणाने घेतला गळफास

पत्नी, मेहुणीसह इतरांचे नावे लिहून तरुणाने घेतला गळफास

Next

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामचंद्र उर्फ भुरा देवराम (माळी) महाजन हा तरूण गेल्या सहा महिन्यांपासून सुरत येथे पत्नी निकिता व मुलगी रक्षा सोबत राहत होता. वाहनावर चालकाचे काम करुन उदरनिर्वाह भागवायचा. गावात ग्रामपंचायतीची निवडणूक असल्यामुळे तो गावी आला होता. दरम्यान, कौटुंबिक कारणामुळे पत्नी निकिता मुलगी रक्षाला घेवून खामगाव (बुलढाणा) येथे माहेरी निघून गेली आहे, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तणावात होता. शनिवारी सायंकाळी ४ वाजता वडील देवराम सूपडू माळी हे वरच्या घरात गेले असता मुलाने गळफास घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.

अक्षरामुळे आरोपाबाबत अस्पष्टता

तत्पूर्वी त्याने लाल मार्करने भिंतीवर सुसाईड नोट लिहिली. यात पत्नी, सासू, साडू आणि पत्नीची बहिण यांच्यावर आरोप केले आहे. सुसाईड नोट व्यवस्थित वाचता येत नसल्यामुळे चौघांवर नेमके काय आरोप केले आहे, हे स्पष्ट होत नाही. रामचंद्र याच्या पश्चात आई कल्पनाबाई, वडील देवराम माळी, भाऊ रामकृष्ण, पत्नी व मुलगी असा परिवार आहे. तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास हवालदार सुधाकर शिंदे करीत आहेत

Web Title: The young man took the gallows by writing the names of his wife, sister-in-law and others

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.