मध्यरात्री घराबाहेर बोलावून तरुणावर शस्त्राने केले वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:18 AM2021-02-16T04:18:17+5:302021-02-16T04:18:17+5:30

जळगाव : मोबाइल घेण्याच्या बहाण्याने घराच्या बाहेर बोलावून शाहरुख ऊर्फ अशपाक सलीम खाटीक या तरुणावर दोघांनी चॉपरसारख्या शस्त्राने पोटावर ...

The young man was called out of the house in the middle of the night and attacked with a weapon | मध्यरात्री घराबाहेर बोलावून तरुणावर शस्त्राने केले वार

मध्यरात्री घराबाहेर बोलावून तरुणावर शस्त्राने केले वार

Next

जळगाव : मोबाइल घेण्याच्या बहाण्याने घराच्या बाहेर बोलावून शाहरुख ऊर्फ अशपाक सलीम खाटीक या तरुणावर दोघांनी चॉपरसारख्या शस्त्राने पोटावर डोक्यावर वार केल्याची घटना मध्यरात्री अडीच वाजता तांबापुरातील बिस्मिल्ला चौकात घडली. याप्रकरणी अमिन ऊर्फ बुलेट पटवा व सरजील हारुण पटवा (दोन्ही रा. तांबापुरा) या दोघांविरुध्द सोमवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाहरुख व त्याचा मित्र अब्दुल मजीद मुक्तार बागवान हे दोघे जण त्यांचा मित्र प्रवीण वाघ याचे लग्न असल्याने १३ फेब्रुवारी रोजी लग्नात गेले होते. तेथे नाचण्याच्या कारणावरून शाहरुख व त्याचा मित्र बागवान यांच्यात वाद झाला होता. हा वाद तेथेच मिटविण्यात आला होता. १४ रोजी रात्री ९ वाजता बागवान याचा मोबाइल अमिन ऊर्फ पटवा हा फोन करण्याचे सांगून घेऊन गेला. त्यानंतर १५ रोजी रात्री पहाटे अडीच वाजता बागवान याच्या मोबाइलवरून अमिन पटवा याचा शाहरुख याला फोन आला व बागवान याचा मोबाइल माझ्याकडे राहिला आहे, तो घेऊन जा असे सांगितले असता शाहरुख घराच्या बाहेर गेला असता सरजील पटवा याने पकडून ठेवत बुलेट याने शाहरुख याच्या पोटावर व डोक्यावर चॉपरसारख्या शस्त्राने वार केले. हा आवाज ऐकून आई नसीम खाटीक बाहेर धावत आली. यावेळी दोघे जण तुला जास्त झाले आहे, आता जिवंतच ठेवत नाही असे शाहरुखला म्हणत होते. गल्लीत आरडाओरड केल्याने शेजारील लोक धावून आले व दोघांच्या तावडीतून शाहरुखला सोडविले. प्रचंड रक्तस्राव होत असल्याने या लोकांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

Web Title: The young man was called out of the house in the middle of the night and attacked with a weapon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.