तरुण वळले शेळीपालनाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2017 06:06 PM2017-05-15T18:06:49+5:302017-05-15T18:06:49+5:30

उत्पन्न खर्चही निघू शकत नाही अशा विविध कारणांमुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे.

The young turned towards sheep | तरुण वळले शेळीपालनाकडे

तरुण वळले शेळीपालनाकडे

googlenewsNext

महेंद्र रामोशे / ऑनलाइन लोकमत

अमळनेर, जि. जळगाव, दि. 15 - गेल्या काही वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचबरोबर उत्पन्न जास्त आले तर बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे उत्पन्न खर्चही निघू शकत नाही अशा विविध कारणांमुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे.  या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तालुक्यातील अनेक शेतक:यांनी शेळीपालन हा पूरक व्यवसाय सुरू केला आहे.  ग्रामीण भागातील अनेक सुशिक्षित तरुण शेळीपालनाच्या व्यवसायाकडे वळले आहेत. त्यामुळे आज अमळनेर तालुक्यात तब्बल 23 गावांमध्ये शेळीपालनाचा व्यवसाय जोमात सुरू झालेला आहे. शेळीला गरिबांचे धन म्हटले जाते. आजही ग्रामीण भागात शेळी पाळणे हा व्यवसाय आर्थिक दुर्बल घटकापुरताच मर्यादित आहे. मात्र शेळीपालनातून होणारा आर्थिक फायदा लक्षात घेऊन शेतकरी कुटुंबातील सुशिक्षित तरुण या व्यवसायाकडे वळले आहेत. तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. व्ही.बी. भोई आणि डॉ .एस. वाय. पाटील यांचे मार्गदर्शन मिळत आहे. ग्रामीण भागात शेळीला आवश्यक असणारा चारा ब:यापैकी उपलब्ध आहे. त्यामुळे काही भागात अर्ध बंदिस्त तर काहींनी पूर्ण बंदिस्त शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. ज्या भागात चारा उपलब्ध नाही ते बाहेरून चारा विकत आणून शेळी पाळत आहेत. मात्र पशु वैद्यकीय विभागाच्या वतीने शासकीय दराने चारा उपलब्ध करून दिल्यास निश्चितच आणखी काही तरुण या व्यवसायाकडे वळू शकतील असे मत तरूणांनी व्यक्त केल़े तालुका पशुवैद्यकीय डॉ. व्ही.बी. भोई आणि डॉ. एस. वाय. पाटील यांनी व्हॉट्स अपचा ग्रुप बनवला आहे. त्यावर शेळी पालनाबाबत मार्गदर्शन केले जाते. तसेच वेळोवेळी लसीकरण आणि औषधी कशा पद्धतीने द्याव्यात याचीही माहिती ग्रुपद्वारे दिली जाते.
शेळी विकण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी स्वतंत्रपणे बाजार नाही. बाजार समितीने पुढाकार घेऊन स्वतंत्र शेळी बाजार भरवला पाहिजे, व भावदेखील ठरवून दिला पाहिजे, ज्यामुळे  शेळी पालन करणा:या  व्यावसायिकांचे नुकसान होणार नाही.
शेळीपालन करणारे व्यावसायिक
महेंद्र रामोशे आणि विनोद खैरनार (गंगापुरी), जालिंदर चौधरी व मच्छिंद्र चौधरी (गांधली), कपिल चौहान व अक्षय चौहान, अजापुत्र गोट फार्म, प्रदीप महाजन, महेश पाटील, लक्ष्मीकांत पाटील (सर्व अमळनेर), रामराव पाटील (जुनोने), गणेश पाटील (फाफोरे)े, अरुण पाटील, सतीलाल परदेशी, ज्ञानेश्वर पाटील (सर्व रंजाने), शिवा चौधरी (पळासदळे), दत्तात्रय बाविस्कर (रामेश्वर), गोरख चौधरी (गांधली),  अमोल राणे (दहिवद), संजय पाटील (जैतपीर), महेंद्र बोरसे, विलास पाटील, अनिल शिसोदे (डांगरी), विजय पाटील (रामेश्वर), दिनेश पाटील (खेडी),  रमण भदाणे (मंगरूळ) यांचा समावेश आहे.

शेतीला जोड धंदा म्हणून शेळीपालन केल्यास मोठा आर्थिक फायदा होतो. त्यामुळे शेतक:यांनी  या व्यवसायाकडे वळले पाहिजे. त्यांना पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय विभागाकडून वेळोवेळी मार्गदर्शन केले जाईल.
- डॉ. व्ही.बी. भोई, पशुवैद्यकीय अधिकारी, अमळनेर

Web Title: The young turned towards sheep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.