वृध्दाला मारहाण करुन लुटले
By admin | Published: January 17, 2017 12:21 AM2017-01-17T00:21:15+5:302017-01-17T00:21:15+5:30
शिवाजी उद्यानातील घटना : पाच जणांना घेतले ताब्यात
जळगाव: मुलाच्या लगAाची पत्रिका वाटप करुन घरी जात असताना शिवाजी उद्यानाजवळ रिक्षातून आलेल्या पाच ते सात जणांच्या टोळीने अरुण काशिनाथ सोनार (वय 60 रा.जुने भगवान नगर)या वृध्दालाबेदम मारहाण करुन त्यांच्याजवळील 48 हजार 800 रुपये व मोबाईल असा 50 हजाराच्यावर ऐवज लुटून नेण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी दिवसभर शोध मोहीम राबवून पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.
एस.टी.महामंडळातून सेवानिवृत्त झालेले सोनार यांच्या मुलाचे 20 जानेवारी रोजी लगA आहे. सोनार हे या लगAाची पत्रिका वाटपाचे काम करीत आहेत. रविवारी रामेश्वर कॉलनीतील नातेवाईकांकडे पत्रिका देवून दुचाकीने (क्र.एम.एच.19 बी.पी.3301) घराकडे जात असताना शिवाजी उद्यानाजवळ पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या दोन गुन्हेगारांनी त्यांच्या अन्य साथीदारांना टीप दिली.अंधाराचा फायदा घेत या टोळीने त्यांना ‘काका इकडून जावू नका, पुढे रस्ता खराब आहे’ असे सांगून रस्त्यात थांबविले. नंतर काही क्षणातच मारहाण करुन खिशातील रोकड व मोबाईल लांबवून पळ काढला.
दरम्यान, या घटनेनंतर सोनार यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांच्याकडे घटना कथन केली. कुराडे यांनी तातडीने उपनिरीक्षक रोहन खंडागळे, गुन्हे पथकाचे शरद भालेराव, गोविंदा पाटील, जितेंद्र राजपूत, विजय नेरकर, अशरफ शेख व अशोक सनगत यांचे पथक संशयितांच्या शोधासाठी रवाना केले. पथकातील प्रत्येकाने आपल्या खब:यामार्फत माहिती काढली असता टोळीतील काही संशयिताचे नाव निष्पन्न झाले. दरम्यान, सहायक अधीक्षक निलोत्पल हे देखील पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. दिवसभर शोध मोहीम राबविल्यानंतर संध्याकाळर्पयत पाच संशयित हाती लागले.
हॉटेलमध्ये हाणामारी; पाच जणांना अटक
रेल्वे स्टेशनजवळील हॉटेलमध्ये जेवण न दिल्याच्या कारणावरुन हाणामारी करुन मोबाईलसह रोकड लांबविणा:या पाच जणांना सोमवारी शहर पोलिसांनी अटक केली. जगदीश सुकलाल भोई (वय 26, रा.कोल्हे गोडाऊन, कोळीपेठ), मुकेश किशोर बाविस्कर (वय 21, रा.द्वारकानगर, जुना खेडीरोड, जळगाव), तुषार किशोर जाधव (वय 21, रा.देविदास कॉलनी), विष्णु गोविंद प्रजापत (वय 22, रा.ईश्वर कॉलनी) व शिंदे यांचा त्यात समावेश आहे.