कौटुंबिक वादातून लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 09:59 PM2020-06-19T21:59:04+5:302020-06-19T21:59:14+5:30

जळगाव : घरगुती भांडणातून लहान भावाने मोठ्या भावाला लाकडी दांड्याने मारहाण करून त्याची हत्या केल्याची घटना जळगाव तालुक्यातील म्हसावद ...

The younger brother killed the older brother in a family dispute | कौटुंबिक वादातून लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या

कौटुंबिक वादातून लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या

Next

जळगाव : घरगुती भांडणातून लहान भावाने मोठ्या भावाला लाकडी दांड्याने मारहाण करून त्याची हत्या केल्याची घटना जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे गुरूवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. यात लहान भावास अटक करण्यात आली आहे.
जितेंद्र प्रकाश इंगळे (कोळी) (३०) असे या मृत इसमाचे तर संदीप प्रकाश इंगळे (कोळी) अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
म्हसावद येथील खडसे नगरात जितेंद्र इंगळे हा लहान भाऊ संदीप आणि आई प्रमिलाबाई यांच्यासह वास्तव्यास होता़ जितेंद्र याला दारूचे व्यसन होते़ गुरूवारी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान जितेंद्र आणि संदीप या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले़ जितेंद्र हा दारूच्या नशेत शिवीगाळ करीत होता़ यात संतापाच्या भरात संदीप याने मोठ्या भावास लाकडी दांड्याने मारहाण केली़ डोक्यात लाकडी दांडका बसल्याने त्यातच मोठा भाऊ जितेंद्र याचा मृत्यू झाला.

भांडण सोडविण्यासाठी आले अन् त्यांनाही झाली मारहाण
शेजारी राहणारे दशरथ धरमसिंग वाघेले यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतु, संदीपने त्यांच्यावरही हल्ला चढविला अन् त्यांच्या हातावर व डोक्यावर काठी मारून त्यांना जखमी केले. जितेंद्रचा मामा दशरथ गंगाराम कोळी तेथे आला. त्यांनी जखमींना उपचारार्थ नेले़ परंतु, जितेंद्र याचा मारहाणीमुळे मृत्यू झाल.

गावातून केली अटक
मोठ्या भावाची हत्या केल्यानंतर संशयित लहान भाऊ हा म्हसावद गावात लपून बसला होता़ त्याचा शोध घेवून पोलीस कॉन्स्टेबल समाधान पाटील, स्वप्नील पाटील अशांनी त्यास ताब्यात घेतले़ त्याची कसून चौकशी केल्यानंतर गुन्हा कबुल केला़ दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक डॉ़ नीलाभ रोहन, एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक विनायक लोकरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.

Web Title: The younger brother killed the older brother in a family dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.