तरुणाने रेल्वेखाली उडी घेऊन संपवले जीवन, अकस्मात मृत्यूची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 17:42 IST2023-09-16T17:41:40+5:302023-09-16T17:42:12+5:30
प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तरुणाने रेल्वेखाली उडी घेऊन संपवले जीवन, अकस्मात मृत्यूची नोंद
जळगाव : धावत्या रेल्वेसमोर येत मधुकर हिंमत मकवाना (४५, रा. हरिविठ्ठल नगर) या तरुणाने आत्महत्या केली. ही घटना १४ सप्टेंबर रोजी रात्री आत्महत्या कॉलनी नजीक रेल्वे रुळावर घडली. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आत्महत्या कॉलनीनजीक रेल्वे रुळाववर खंबा क्रमांक ४१६/५जवळ धावत्या रेल्वेसमोर एक इसम आला असल्याची माहिती रेल्वेच्यावतीने रामांनद नगर पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी इसमाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. तेथे डॉक्टरांनी मयत घोषित केले. तपासामध्ये मयताचे नाव मधुकर हिंमत मकवाना असल्याचे स्पष्ट झाले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ सुनील पाटील करीत आहेत.