अॅप सांगणार तुमचा स्वभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2017 12:30 PM2017-06-16T12:30:29+5:302017-06-16T12:30:29+5:30

अमळनेर येथील वेदांशू पाटीलने यांनी विकसीत केले अॅप

Your app will tell you the app | अॅप सांगणार तुमचा स्वभाव

अॅप सांगणार तुमचा स्वभाव

Next

 संजय पाटील/ ऑनलाईन लोकमत विशेष 

अमळनेर,दि.16 -अमळनेर येथील वेदांशु पाटील या तरुणाने ‘डिजिटल हॅन्डरायटिंग,अँड ड्रॉईंग अनलिसिस’ या अॅपच्या माध्यमातून मानवी स्वभाव व गुणविशेषाची माहिती सांगणारे अॅप विकसीत केले आहे. 
जीवनात  यशस्वी व्हायचे असेल तर माणसे ओळखता आली पाहिजे असे आपण म्हणतो.  परंतु अनेकदा वाईट अनुभवातूनच माणसे पारखली जातात, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. मात्र आता वेळ न जाऊ देता माणूस न भेटताही त्याचा स्वभाव आणि गुणविशेष जाणून घेता येणार आहे. 
अमळनेर येथील वेदांशु रवींद्र पाटील हा जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील यांचा मुलगा असून त्याने सिंगापूर येथून एम.बी.ए केले आहे.आंतरराष्ट्रीय हस्ताक्षर विज्ञान संस्थेतून शिक्षण घेतले आहे. त्याने स्वत:ची ‘बिझनोफेअर्स’ ही संस्था सुरू केली आहे.  त्या माध्यमातून व्यक्तीचा स्वभाव आणि त्याचे गुण, त्याचा जीवनाकडे बघण्याचा कल, त्याची दिशा, प्रवृत्ती अशा अनेक मानवी गुण विशेषांवर प्रकाश टाकणा:या  ‘डिजिटल हॅन्डरायटिंग अँड ड्रॉईंग अनलिसिस’ या अॅपचे संशोधन करून त्याला कार्यान्वित केले आहे. 
या अॅपच्या माध्यमातून व्यक्तीच्या हस्ताक्षर आणि चित्र काढण्याची त:हा याचे विेषण करून बेरोजगार तरुणांना न भरकटता भविष्यात जगण्याची आणि जीवनाचा कल कोणत्या दिशेने योग्य राहिल, याचे मार्गदर्शन होवू शकेल. तसेच एखाद्या ओळखीच्या व्यक्ती बरोबर व्यवसाय, व्यवहार, मैत्री, राजकीय संबंध प्रस्थापित करायचे असतील तर त्याच्या स्वभावाची जाणीव आधीच झाल्यास फसवणूक टाळता येणार आहे. 
नाशिक येथे नुकतेच विश्वास सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर यांच्या हस्ते या अॅपचे उदघाटन करण्यात आले.  ‘प्ले स्टोर’  वर हे अॅप उपलब्ध आहे. यावेळी इंजेनिअर्स पार्क टेक्नॉलॉजिचे संचालक विक्रम बोडके, प्रणव राजपूत उपस्थित होते.

Web Title: Your app will tell you the app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.