ऑनलाइन तीन पत्ती खेळात तरुणाची ३२ लाखांत फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 10:53 PM2023-01-08T22:53:30+5:302023-01-08T22:53:54+5:30

ऑनलाइन तीन पत्ती खेळात एका तरूणाची तब्बल ३२ लाखात फसवणूक झाल्याचा प्रकार यावलमध्ये घडला. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Youth cheated of 32 lakhs in online three card game | ऑनलाइन तीन पत्ती खेळात तरुणाची ३२ लाखांत फसवणूक

ऑनलाइन तीन पत्ती खेळात तरुणाची ३२ लाखांत फसवणूक

googlenewsNext

डी.बी. पाटील

यावल जि. जळगाव :  ऑनलाइन तीन पत्ती खेळात एका तरूणाची तब्बल ३२ लाखात फसवणूक झाल्याचा प्रकार यावलमध्ये घडला. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील या व्यावसायिक तरुणाला दोन अज्ञात लोकांनी संपर्क साधला आणि त्याला तीन पत्ती व ड्रॅगन टायगर हे गेम खेळण्यास लावले आणि त्यास त्यासाठी प्रोत्साहित केले. तरुण गेम खेळत असतांना या दोन जणांनी तरुणाच्या बँक खात्यातून तब्बल ३२ लाख ५० हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने लांबवले. 

आपली फसवणूक झाल्याचे  निदर्शनास आल्याने तरुणाने यावल पोलीस स्टेशन गाठले. त्याच्या फिर्यादीवरुन दोन अज्ञात लोकांविरुद्ध  फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे करीत आहेत.

Web Title: Youth cheated of 32 lakhs in online three card game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव