कौटुंबिक वादातून तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:04 PM2019-04-28T12:04:12+5:302019-04-28T12:04:41+5:30
अकस्मात मृत्यूची नोंद
Next
जळगाव : पती पत्नीच्या वादातून नैराश्यात आलेल्या रवी अंकुश गरुड (२६) या तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता शिवाजी नगरातील रोहनवाडीत घडली. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी हा पत्नी व दोन मुलांसह उधना (सुरत) येथे राहत होता. पत्नीशी नेहमीच वाद होत असल्याने आठ महिन्यापासून रोहणवाडीत राहत असलेल्या आईकडे आला होता. कुटुंब घरात असताना रवी हा वरच्या मजल्यावर गेला आणि ओढणीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले व भाऊ असा परिवार आहे.