मुलगी झाल्याने तरुणाची आत्महत्या
By admin | Published: January 16, 2017 01:04 AM2017-01-16T01:04:01+5:302017-01-16T01:04:01+5:30
आव्हाणे येथील घटना : पाण्याच्या टाकीवरुन घेतली उडी
जळगाव : तीन मुलींच्या पाठीवर चौथीही मुलगीच झाल्याने रवींद्र प्रकाश सोनवणे (वय 24) या तरुणाने घराजवळ असलेल्या गावाला पाणी पुरवठा करणा:या पिण्याच्या पाण्याच्या टाकीवरुन उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी साडे बारा वाजता आव्हाणे ता.जळगाव येथे घडली. रवींद्र नदीपात्रात मजुरीने वाळू भरण्याचे काम करत होता. या घटनेप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रवींद्र याचे पाच वर्षापूर्वी लगA झाले होते. मुलाचे स्वपA असताना त्याला मुलीच्या पाठोपाठ तीन मुली झाल्या. चौथा तरी मुलगाच होईल असे रवींद्रला वाटले होते. मात्र तीन दिवसापूर्वीच प}ी प्रसुत झाली व तिने मुलीला जन्म दिल्याचे समजताच रवींद्र तणावात आला.
मुलीच्या जन्मामुळे प्रचंड नैराश्य आल्याने रविवारी दुपारी तो घराशेजारीच असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढला व तेथून खाली उडी घेतली.
पतंग उडविणा:या मुलांचे गेले लक्ष
रवींद्रने ज्या पाण्याच्या टाकीवरुन उडी घेतली त्या टाकीवर गल्लीतील मुले पतंग उडवत होते. रवींद्र पतंग पाहण्यासाठी सहज आला असावा म्हणून या मुलांनी त्याच्याकडे लक्ष दिले नाही, मात्र टाकीवरुन उडी घेतल्याने जोरदार आवाज होताच मुलांनी व शेजारच्यांनी धाव घेतली. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
गुप्तांग व शरीरातील अन्य भागाला मुका मार लागल्याने रवींद्रचा मृत्यू झाला. जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले व सायंकाळी अत्यसंस्कार करण्यात आले.
चौथ्या मुलीचे नावही ठेवले नाही
रवींद्रच्या चौथ्या मुलीचे अद्याप नाव देखील ठेवण्यात आलेले नाही. त्याच्या पश्चात प}ी वंदना, आई वसंताबाई, चार मुली, तीन भाऊ असा परिवार आहे. वडीलांचे दोन वर्षापूर्वीच निधन झाले आहे. कुटूंबातील सर्व सदस्य हातमजुरी करुन उदरनिर्वाह करतात.