कुऱ्हाड येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 23:14 IST2021-06-27T23:13:15+5:302021-06-27T23:14:00+5:30
बारी शिवारातील जंगलात बेढ्याच्या झाडाला दोराने गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केली.

कुऱ्हाड येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
ठळक मुद्देपिंपळगाव हरे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव (हरे.), ता. पाचोरा : पिंपळगाव हरेश्वर येथून जवळच असलेल्या कुऱ्हाड तांडा (ता. पाचोरा) येथून जवळच असलेल्या बारी शिवारातील जंगलात बेढ्याच्या झाडाला दोराने गळफास घेऊन मनोज चत्रू जाधव (१९, कुऱ्हाड तांडा) याने आत्महत्या केली.
याबाबतची खबर त्याचा मामा राजू सखाराम राठोड (४३, कुऱ्हाड) यांनी दिली आहे. यावरून पिंपळगाव हरे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नीता कायटे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे. काॅ. शैलेश चव्हाण करीत आहेत.