जळगावात तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:27 PM2017-09-12T12:27:53+5:302017-09-12T12:29:05+5:30
अकस्मात मृत्यूची नोंद
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 12 - भोईटे नगरात राहणा:या सचिन रमेश जाधव (वय 36 ) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी पावणे बारा वाजता उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सचिन जाधव हा मजूर फेडरेशन व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या कार्यालयात कामाला होते. सोमवारी सकाळी 11 वाजता सचिन कामावर आला नाही म्हणून मजूर फेडरेशनचे कर्मचारी वाल्मिक देशमुख यांनी मोबाईलवर संपर्क केला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने देशमुख यांनी पावणे बारा वाजता भोईटे नगरातील घर गाठले. दरवाजा ठोठावल्यावरही प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा उघडून घरात प्रवेश केला असता किचनमध्ये ओढणीच्या सहायाने सचिनने गळफास घेतल्याचे दिसून आले.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर देशमुख यांनी शहर पोलिसांशी संपर्क केला. त्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. सायंकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, सचिन याची प}ी माहेरी धुळे येथे गेलेली होती. त्याला दोन मुली आहेत. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.