जळगावात तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 12:06 PM2019-06-07T12:06:32+5:302019-06-07T12:07:09+5:30
घरात गळफास
जळगाव : बारदान विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या संदीप चंद्रकांत राजपूत (३६, मुळ रा.शिरसाळा, ता.यावल) या तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी दोन वाजता अयोध्या नगरातील सदगुरु नगरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप हा बारदान खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. गुरुवारी दुपारी दोन वाजेपूर्वी राहत्या घरात एकटा असताना गळफास घेतला. पत्नी आल्यानंतर हा प्रकार उघड झाला. पतीने आत्महत्या केल्याचे समजताच पत्नीने आरडाओरड केली हा आवाज ऐकून शेजारील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत संदीप याला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले असता वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी त्यास मृत घोषीत केले. संदीप याच्या पश्चात आई, वडील, पत्नी,दोन मुली असा परिवार आहे. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. डॉ. प्रवीण पाटील यांच्या माहितीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही, मात्र संदीप हा कुणाच्याही मदतीला धावून जायचा.