युवा परिषदेतर्फे १८ गुणवंतांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 04:00 PM2020-09-21T16:00:56+5:302020-09-21T16:01:30+5:30
विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन : पुस्तके आणि वृक्षांचे वाटप
जळगाव : शहरातील जळगाव युवा परिषदेच्यावतीने तालुक्यातील होतकरू आणि गरिबीतून शिक्षण घेवून दहावी, बारावी परीक्षा उत्तीर्ण करणा-या १८ गुणवंत विद्यार्थ्यांचा सोमवारी सन्मानपत्र तसेच पुस्तक व वृक्ष देवून गौरव करण्या आला. सोशल डिस्टिन्सिंग पाळत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी कार्यक्रमाची सुरूवात ही माता सरस्वती व गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व मार्ल्यापण करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा परिषदेचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तेजस पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विश्वनाथ महाजन यांच्यासह
किशोर गुंजाळ , राकेश मुंडले, प्रतिक्षा पाटील, अनिल बाविस्कर, दिव्या यशवंत भोसले, आकाश धनगर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमात तेजस पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी आज विद्यार्थी दशेत तूम्ही केलेल्या परिश्रमातून तूमचा सन्मान होत आहे, यातून प्रेरणा घेऊन भविष्यात उज्वल कामगिरी करुन सत्कारास पात्र ठरून गावासह परिसराचे नाव उज्वल करा, असे सांगितले. त्यानंतर गुणवंत दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्याहस्ते सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला.
यांनी घेतले परीश्रम
कार्यक्रम यशस्वितेसाठी जिल्हा पदाधिकारी अविनाश जावळे, इरफान पिंजारी, तालूका मुख्य सचिव तुषार विसपुते, तालूका सचिव विलास पाटील, तालूका समन्वयक विनय जैन, कल्पेश पाटील, इलियास पिंजारी, यांनी परिश्रम घेतले.