विधवा भावजयीला दीर योगेशने दिला आधार
By admin | Published: July 1, 2017 12:50 PM2017-07-01T12:50:20+5:302017-07-01T12:50:20+5:30
माळी समाजातील आदर्श विवाह
Next
>लोकमत न्यूज नेटवर्क
जामनेर : विधवा भावजयीशी विवाह करून तिच्यासह तिच्या मुलीला स्वीकारण्याचा आदर्श एका दिराने घालून दिला आहे.
भोजे, ता. पाचोरा येथील ज्ञानेश्वर सुधाकर जाधव (माळी) यांचा गेल्या वर्षी 14 जूनला पाचोरा- भडगाव रस्त्यावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. मृत्यूसमयी त्यांची प}ी सुमित्रा ही गर्भवती होती. त्यानंतर तिने मुलीला जन्म दिला. मयत ज्ञानेश्वरचे वडील सुधाकर जाधव, सुमित्राचे वडील भिकारी भडांगे, पंढरी द्राक्षे, सुभाष माळी, कैलास क्षीरसागर, भोजे गावचे सरपंच व नागरिकांनी सुमित्रा हिचा विवाह ज्ञानेश्वरचा लहान भाऊ योगेश याचेशी करण्याचा प्रस्ताव मांडला. योगेशनेदेखील यास संमती देऊन विधवा भावजयीला मुलीसह स्वीकारण्याचे कबूल केले. शुक्रवारी पिंपळगाव हरेश्वर येथील हरेश्वर मंदिरात कुटुंबीय व समाज बांधवांच्या उपस्थितीत हा आदर्श विवाह सोहळा पार पडला.