गेंदालाल मीलमधील तरुणाचा धरणात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 10:15 PM2017-09-17T22:15:04+5:302017-09-17T22:17:02+5:30

पोहण्यासाठी गेलेल्या शेख अक्रम नियाज (वय १७, रा.गेंदालाल मील, जळगाव) या तरुणाचा नशिराबादजवळील मुर्दापूर धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना रविवारी सायंकाळी साडे पाच वाजता घडली. अक्रम याला पोहता येत नव्हते. धरणातील गाळात रुतल्याने नाकात व तोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला.

The youth of Gendalal mile drowned in the dam | गेंदालाल मीलमधील तरुणाचा धरणात बुडून मृत्यू

गेंदालाल मीलमधील तरुणाचा धरणात बुडून मृत्यू

Next
ठळक मुद्दे नशिराबादजवळील मुर्दापूर धरणातील दुर्घटना गाळात फसल्याने झाला मृत्यूसहाजणगेलेहोतेपोहण्यासाठी

आॅनलाईन लोकमत 

जळगाव:दि,१७ पोहण्यासाठी गेलेल्या शेख अक्रम नियाज (वय १७, रा.गेंदालाल मील, जळगाव) या तरुणाचा नशिराबादजवळील मुर्दापूर धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना रविवारी सायंकाळी साडे पाच वाजता घडली. अक्रम याला पोहता येत नव्हते. धरणातील गाळात रुतल्याने नाकात व तोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाजणगेलेहोतेपोहण्यासाठीधरणावर या घटनेबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शेख अक्रम याच्यासह मुदूनसर शेख गनी (वय १८ रा.भिलपुरा चौक, जळगाव), शरीफ शेख इद्रीस (वय १७ रा.उस्मानिया पार्क, जळगाव), नवाज शेख अलाउद्दीन (वय १६), उमेदखान फिराज खान (वय १८ रा.भिलपुरा) व अदनान (पूर्ण नाव नाही) असे सहा तरुण रविवारी दुपारी चार वाजता रिक्षातून नशिराबाद गावाजवळ असलेल्या मुर्दापूर धरणात पोहण्यासाठी आले होते. अक्रमअडकला गाळात सर्व तरुण धरणात पोहत असताना साडे पाच वाजता पाऊस सुरु झाला. त्यावेळी अक्रम वगळता सर्व जण धरणातून बाहेर आले.अक्रम गाळात अडकल्याने त्याला बाहेर येता येत नव्हते. पाण्यात डुबक्या घेतल्याने अन्य मित्र घाबरले. त्यांनी तातडीने तेथून जळगावातील सैय्यद आसिफ व पप्पू खाटीक या तरुणांना घटनेची माहिती दिली. त्यांनीही तातडीने नशिराबाद येथील नातेवाईकांनी घटनेची माहिती देत घटनास्थळी रवाना केले. सहायक पोलीस निरीक्षक आर.टी.धारबळे व सहकाºयांनीही लागलीच घटनास्थळ गाठले. गावातील पोहणाºया लोकांनी तातडीने अक्रमला बाहेर काढले. जिल्हा रुग्णालयात प्रचंडगर्दी धरणातून बाहेर काढल्यानंतर अक्रम याला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. दरम्यान, अक्रमच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर शहरातील समाजबांधव व मित्रांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. प्रचंड गर्दीमुळे रुग्णालयात पाय ठेवायलाही जागा नव्हती. शहर पोलीस स्टेशन, जिल्हा पेठ व निर्भया पथकाला पाचारण करण्यात आले होते. तासाभरानंतर गर्दी दूरझाली. अक्रममेहनती मुलगा अक्रम याने चौथीपासून शाळा सोडली होती. वडील शेख नियाज मोहम्मद मोती यांचा बर्फाचा गोला विक्रीचा व्यवसाय आहे.‘मुस्कान गोला’ नावाच्या त्यांच्या चित्रा चौक, सतरा मजली इमारत व बहिणाबाई उद्यान येथे हातगाडी लागते. अक्रम हा वडीलांना हातभार लावत असे. धंद्यात मंदी असल्याने तो सध्या चित्रा चौकात इलेक्ट्रीक दुकानावर कामाला लागला होता. अतिशय कष्टाळू म्हणून तो सर्वांना परिचित होता.

Web Title: The youth of Gendalal mile drowned in the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.