पाटणा अभयारण्य प्रदूषणमुक्त करण्यासाठी तरुणांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:20 AM2021-08-14T04:20:11+5:302021-08-14T04:20:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चाळीसगाव : पाटणा अभयारण्यात मागील काही महिन्यांपासून चंदन, गारगोटी, वाळू, तस्करी, तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी ...

Youth initiative to de-pollute Patna Sanctuary | पाटणा अभयारण्य प्रदूषणमुक्त करण्यासाठी तरुणांचा पुढाकार

पाटणा अभयारण्य प्रदूषणमुक्त करण्यासाठी तरुणांचा पुढाकार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : पाटणा अभयारण्यात मागील काही महिन्यांपासून चंदन, गारगोटी, वाळू, तस्करी, तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी यांची चौकशी, वनपाल-वनरक्षक निलंबन अशा घटना घडल्या. त्यामुळे अभयारण्यात भविष्याची चिंता चाळीसगावातील सारेच करतात. पण शहरातील तरुणांचा एक ग्रुप जंगलात भटकंती करत असताना जंगलासाठी काहीतरी केले पाहिजे. या दृष्टिकोनातून त्यांनी ‘जंगल जगवा’ ही मोहीम गौताळा फाउंडेशनद्वारा अभयारण्यात कृतिशील सुरू केली आहे.

पाटणा जंगल सफारी सध्या अनेक पर्यटकांचा आकर्षणाचा विषय ठरली आहे. मात्र या पर्यटकांकडून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. त्यामुळे वन्यप्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. यावर गौताळा फाउंडेशनच्या तरुणांनी अभयारण्यात पाटणादेवी प्रवेशद्वार ते हेमाडपंथी महादेव मंदिर या एवढ्या परिसरात एकूण २५ ते ३० गोण्या कचरा जमा करण्यात आला. त्यामुळे या तरुणांकडून आदर्श घेण्याची गरज चाळीसगावातून व्यक्त केली जात आहे.

पर्यटकांसाठी येथे फलक लावत कचरा टाकणाऱ्यांवर प्रतिबंधक कारवाईच्या सूचना लिहिण्याची गरज आहे. कचरा टाकण्यासाठी विविध ठिकाणी सुविधा देण्याची मागणी गौताळा फाउंडेशनद्वारा करण्यात आली. तेथील हात विक्रेत्यांनी स्वतः पुढाकार घेऊन प्लास्टिक पिशवी बंदी करून त्यावर पर्यायी व्यवस्था निर्माण केली पाहिजे. प्लास्टिक मुक्तीसाठी विक्रेत्यांनी पुढाकार घ्यावा.

यावेळी वनविभागाचे उपवनसंरक्षक सातपुते, मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली, गौताळा फाउंडेशनचे विपुल सोनवणे, निवृत्ती आण्णा कवडे, मिलिंद पाटील, विशाल सोनवणे, डॉ. सारंग पाटील, प्रशांत लवांगे, सिद्धार्थ राजपूत, श्रीकांत राजपूत, दिनेश महाजन, कुलदीप फुलगावकर, धनंजय मराठे, विनोद शिंपी, अक्षय कापडणे, दिनेश बोरसे, आशिष कोळी, भावेश चौधरी, यशवंत बोरसे या तरुणांनी ही मोहीम हाती घेतली आहे.

अभयारण्यात डोळ्यांसमोर पाण्याने खळखळून वाहणाऱ्या नदी, झरे, पाणवठे, पायवाटा, निसर्ग पर्यटन केंद्रे, मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या सुरुवातीला सगळीकडे कचरा पडलेला दिसला. हा कचरा जंगलाची माती खराब करत आहे. जंगलवाढीवर परिणाम होऊन चाळीसगावातील शुद्ध हवेवर परिणाम करणार, पावसाच्या पाण्यासोबत हीच घाण वाहत येऊन शहरातील आपल्या गावातल्या नदी-नाल्यांना मिळणार. म्हणून आम्ही ठरवले प्लास्टिकमुक्त अभयारण्य करू. प्रत्येक रविवारी आम्ही हे कार्य करणार आहोत.

-विपुल सोनवणे, टीम लीडर, गौताळा फाउंडेशन

Web Title: Youth initiative to de-pollute Patna Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.