अडावदनजीक जळगावचा तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2017 01:15 AM2017-02-14T01:15:45+5:302017-02-14T01:15:45+5:30
मित्र जखमी : घरमालकाच्या पुतणीच्या लग्नाला जातानाची घटना
जळगाव : घरमालकाच्या पुतणीच्या लग्नाला जात असताना दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मिलिंद धनराज चौधरी (27) हा तरुण ठार झाला. तर त्याचा मित्र किशोर काशिनाथ शेकोकार (25) दोन्ही रा. सप्तशृंगी कॉलनी, जळगाव हा जखमी झाला. हा अपघात सोमवारी दुपारी साडेबारा वाजता चोपडा तालुक्यातील अडावदनजीक झाला.
मेहरूण परिसरातील सप्तशृंगी कॉलनीमधील रहिवासी मिलिंद चौधरी हा आई-वडील व दोन लहान्या भावांसह भाडय़ाने राहत होता. सोमवारी पंचक येथे घरमालकाच्या पुतणीचे लग्न असल्याने त्यासाठी मिलिंद व त्याचा मित्र किशोर शेकोकार हे दुचाकीवर (एमएच-19-सीजी-0349) गेले होते. त्या वेळी अडावदनजीक समोरुन येणा:या ट्रकची व दुचाकीची धडक होऊन मिलिंदसह मागे बसलेला त्याचा मित्र किशोरही गंभीर जखमी झाला. त्यांना रुग्णवाहिकेद्वारे जळगावला आणत असताना वाटेतच इदगावनजीक मिलिंदची प्राणज्योत मावळली.
जिल्हा रुग्णालयात आक्रोश
मिलिंदचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर घटनेची माहिती मिळताच त्याच्या वडिलांसह दोघं भाऊ व मित्रांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. येथे त्याच्या वडिलांनी व भावांनी मृतदेह पाहताच आक्रोश केला. तसेच मित्रांनाही शोक अनावर झाला होता. संध्याकाळी शवविच्छेदन होईर्पयत त्याचे मित्र जिल्हा रुग्णालयात थांबून होते. सप्तशृंगी कॉलनीतही घटनेची माहिती मिळताच तेथे शोकमग्न वातावरण होते.
सर्वाशी जिव्हाळा
अविवाहित असलेला मिलिंद हा औद्योगिक वसाहत परिसरातील एका कंपनीत कामाला होता तर त्याचे वडील व दोघे भाऊ रिक्षा चालवितात. मनमिळावू स्वभाव असलेल्या मिलिंदचे मित्रपरिवारात सर्वाशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या आकस्मित मृत्यूने मित्रांनाही धक्का बसला आहे.
आईदेखील गेली होती लग्नाला
मिलिंद ज्या लग्नाला जात होता, त्याच लग्नाला त्याची आईदेखील दुस:या वाहनाने गेली होती. घटनेची माहिती मिळताच त्याची आई घरी परतली व त्यांनीही हंबरडा फोडला.
या घटनेतील जखमी किशोर शेकोकार याला जळगावातीलच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.