पोलीस भरतीसाठी युवक-युवतींचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 04:09 PM2019-09-09T16:09:43+5:302019-09-09T16:10:37+5:30
राज्य शासनाने मेगा पेलीस भरती जाहीर करावी तर स्पर्धा परिक्षेसाठी महापरीक्षेमार्फत आॅनलाइन वर लेखी परीक्षा न घेता एम.पी.एस.सी. मार्फत भरती प्रक्रिया राबवावी अशा मागण्यांसाठी तहसील कार्यालयवर मूक मोर्चा नेला.
पोलीस भरतीसाठी युवक-युवतींचा मोर्चा
जामनेर : महापरीक्षेमार्फत परीक्षा न घेता एम.पी.एस.सी. मार्फतच घेण्याची मागणी
जामनेर : पोलीस भरतीची व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तालुक्यातील हजारो युवक- युवतींंनी एकत्र येऊन सोमवारी दुपारी १२ वाजता यश कॉम्प्लेक्स भुसावळ रोड येथून काढला. राज्य शासनाने मेगा पेलीस भरती जाहीर करावी तर स्पर्धा परिक्षेसाठी महापरीक्षेमार्फत आॅनलाइन वर लेखी परीक्षा न घेता एम.पी.एस.सी. मार्फत भरती प्रक्रिया राबवावी अशा मागण्यांसाठी तहसील कार्यालयवर मूक मोर्चा नेला.
महाराष्ट्र राज्यात युतीचे शासन आल्यापासुन पोलीस भरती झाली नाही. ३ सप्टेंबरला पोलिस भरती ची घोषणा होणार होती मात्र ती न होता फक्त ३५०० निवृत्त झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या जागा भरल्या जाणार आहेत. याची विभागवार यादी पाहिली तर त्यात फक्त २ ते ३ विभाग दिसतात. बरेच विभाग रिक्त आहेत. तसेच स्पर्धा परिक्षेसाठी महापरीक्षा पोर्टल मधे अनेक त्रुटी असून त्यात सर्व अस्पष्टता आहेत. ही आॅनलाइन लेखी परीक्षा बंद करुन एम.पी.एस.सी. मार्फत पुर्ववत परीक्षा घ्यावी अशीही मागणी या युवक -युवतींनी केली. आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार नामदेव टिळेकर यांना दिले. यावेळी संदीप डोंगरे, गोपाल बेलपत्रे, सपना पाटील, महेंद्र महाजन, मेहुल चौधरी, राहुल राजपूत, राजश्री पाटील, जयश्री सूर्यवंशी, प्रशांत बिºहाडे, उदयसिंग राजपूत आदी उपस्थित होते.