युवा नाट्य संमेलन, समिती गठित करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 01:29 AM2018-07-18T01:29:21+5:302018-07-18T01:29:52+5:30
अमळनेरात तयारीसाठी पुन्हा रविवारी बैठक
अमळनेर, जि.जळगाव : येथील श्री मंगळदेवग्रह मंदिरात प्रथम विभागीय युवा नाट्य साहित्य संमेलनाच्या तयारीसाठी मंगळवारी बैठक झाली. यात संमेलनाच्या यशस्वितेसाठी सर्वसमावेशक नियोजन समिती गठित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. येत्या रविवारी त्यासाठी महाबैठकीचे आयोजन करण्याचाही निर्णय झाला.
प्रारंभी संमेलनाचे स्वागताध्यक्ष झाल्याबद्दल डिगंबर महाले यांचा ‘मसाप’, अमळनेर शिक्षण मंडळ, सामाजिक कार्यकर्ते भटू पाटील आणि त्यांच्या पत्नी तथा पंचायत समितीच्या माजी उपसभापती पूनम पाटील यांनी सत्कार केला.
बैठकीत संमेलनाच्या शोभायात्रेसह दोन दिवसीय वेळापत्रक, नियोजन समितीतूनच विविध उपसमित्या गठित करणे, संमेलनाचे एकूणच स्वरूप व व्याप्ती याबाबत सविस्तर चर्चा झाली. महत्त्वपूर्ण निर्णयही झाले. अमळनेरला प्रथमच मिळालेल्या या संधीचे सोने करून तिला अविस्मरणीय करण्याबाबत सर्वांचे एकमत झाले.
या वेळी ‘मसाप’ चे कार्याध्यक्ष रमेश पवार, प्रमुख कार्यवाह दिनेश नाईक, कोषाध्यक्ष संदीप घोरपडे, अध्यक्ष नरेंद्र निकुंभ, उपाध्यक्ष शरद सोनवणे, सदस्य प्रा.डॉ.रमेश माने, संजय चौधरी, गोकुळ बागुल, निरंजन पेंढारे, विजया गायकवाड, मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी, साने गुरुजी ग्रंथालयाचे अध्यक्ष आत्माराम चौधरी, ज्येष्ठ कलावंत प्रा.विनय जोशी व संतोष पाटील, कांचन शाह, वसुंधरा लांडगे, भारती गाला, मुख्याध्यापक सतीश देशमुख, डी.ये.धनगर, राजेंद्र निकुंभ, प्रा.डॉ.पी.बी.भराटे, नितीनकुमार शाह, नरेंद्र बाळू पाटील, संदीप अहिरराव, रोहन शिंपी, विपुल पाटील, किरण चौधरी, गौरव पवार, मंगळग्रह सेवा संस्थेचे पदाधिकारी एस.बी. बाविस्कर, एस.एन.पाटील, गिरीश कुलकर्णी, दिलीप बहिरम आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.