युवकांनी वाचविले मोराचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 08:19 PM2020-06-06T20:19:12+5:302020-06-06T20:19:18+5:30
नैसर्गिक अधिवासात सोडले
अमळनेर : तालुक्यातील चांदणी कुºहे येथे दोन दिवसांपासून शेतातील विहिरीत पडलेल्या एका मोराला तरुणांनी शर्थीचे प्रयत्न करत जीवदान देऊन देऊन त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
चांदणीकुºहे येथील शेतकरी दिलीप पांडुरंग पाटील यांच्या शेतातील विहिरीत दोन दिवसांपूर्वी एक मोर पडला होता. विहीर खोल असल्याने; शिवाय तिच्यात पाणी असल्याने मोराला बाहेर पडता येत नव्हते. ही बाब दिलीप पाटील यांचा मुलगा अविनाश याच्या लक्षात आली. त्याने गावातील काही मित्रांना बोलावून मोराला बाहेर काढण्याचे ठरवले. मात्र, तत्पूर्वी अविनाश आणि त्याच्या मित्रांनी वनविभागाच्या कार्यालयाचा संपर्क क्रमांक केला. वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मोराला वाचविण्यासाठी प्रयत्न केले. विहिरीत उतरून या युवकांनी मोरोला जिवदान देऊन नंतर जंगलात सोडले. मोराला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी गणेश देवीदास राजपूत आणि मयूर संजय राजपूत हे दोघे तरुण विहिरीत उतरले होते. अमृत पाटील, राहुल पाटील, चंद्रकांत राजपूत, मंगलेश राजपूत, प्रेमराज राजपूत, शुभम राजपूत, संदेश राजपूत, अभिषेक भोसले यांनी मदत केली.