डोंगरकठोरा येथे युवकाचा गळा चिरून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 12:22 PM2019-10-04T12:22:01+5:302019-10-04T12:22:29+5:30

हत्येचे कारण गुलदस्त्यात

Youth slaughtered in Khongkathora | डोंगरकठोरा येथे युवकाचा गळा चिरून खून

डोंगरकठोरा येथे युवकाचा गळा चिरून खून

Next

जळगाव : तालुक्यातील डोंगरकठोरा येथील शरीफ मेहरबान तडवी (वय १७) या युवकाचा डोंगरकठोरा-परसाळे रस्त्यावरील तेल्या नाल्याच्या काठावर गुरुवारी मृतदेह आढळून आला. युवकाचा अज्ञात मारेक-याने धारदार शस्त्राने गळा कापला असल्याने गावासह परीसरात खळबळ उडाली आहे.
मयत युवक मोलमजुरीचे काम करीत होता. याबाबत मयत युवकाच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील डोंगरकठोरा येथील शरीफ मेहरबान तडवी हा युवक १० वी परीक्षा नापास झाल्यानंतर कुटूंबाच्या चरितार्थ शेतात मोलमजुरी करीत असे.
२ आॅक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास कुटूंबियासोबत जेवण केल्यांनतर शरीफ ७-४० च्या नमाजसाठी गेला.
नमाज पठनानंतर तो परस्पर गावाबाहेरील कब्रस्थानकडे गेला रात्री तो घरी परतला नाही. कुटुंबियांनी त्याच्या जवळील मोबाईलवर फोन केला असता तो बंद आढळून आला.
पो. नि. रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास एपीआय सारीका खैरनार, पो. उ. नि. जितेंद्र खैरनार, हे. कॉ. संजय तायडे हे करीत आहेत.
सकाळी आढळला मृतदेह
गुरूवारी सकाळी वड्री रस्त्यावर तेल्या नाल्याचे काठावर कोणीतरी युवक गंभीर जखमी असल्याचे समजल्यावरून ग्रामस्थाबरोबर शरीफचा भाऊ पाहण्यास गेला असता तेथे शरीफ मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या डोक्यावर, तोंडावर अशा ठिकाणी जखमा दिसून आल्या असून त्याचा धारदार शस्त्राने गळा चिरलेला दिसला.
घटनास्थळापासून काही अंतरावर त्याचा मोबाईल फोडलेल्या अवस्थेत आढळून आला त्याचे तसेच काही अंतरावर गवतात बाजारातून आणलेली गळयातील चैन व रिंग पडलेली आढळून आली. अज्ञात मारेक-याने अज्ञात कारणावरून त्याचा खून केला असल्याचे मयत शरीफचा मोठा भाऊ आसिफ तडवी याने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे. त्याच्या तक्रारीवरून अज्ञात मारेकऱ्याविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Youth slaughtered in Khongkathora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव