जळगावात तरुणाची दगडाने ठेचून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2017 02:55 PM2017-04-19T14:55:15+5:302017-04-19T14:55:15+5:30
शनी पेठेतील जुगार अड्डय़ावर घडली घटना . सीसीटीव्ही फुटेजवरुन पटली दोघांची ओळख
Next
जळगाव,दि.19- शनी पेठेतील शनी मंदिरासमोर तळघरात असलेल्या जुगार अड्डय़ावर प्रवीण सुरेश माळी वय 30 रा.सत्यम पार्क, दूध फेडरेशन रोड, जळगाव) या तरुणाची मध्यरात्री डोक्यात दगड टाकून हत्या झाली आहे. बुधवारी सकाळी 9 वाजता साफसफाईसाठी गेलेल्या तरुणाला प्रवीणचा मृतदेह आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली. दरम्यान, दोन तरुण तळमजल्याकडे दगड घेऊन जातांना सीसीटीव्ही कॅमे:यात कैद झाले असून त्यांनीच ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.
शनी पेठेतील शनी मंदिरासमोर वेलकम फोटो स्टुडीओ असलेल्या इमारतीच्या तळमजल्यात काही दिवसापूर्वीच पत्त्याचा अड्डा सुरु झाला आहे. मध्यरात्री उशिरार्पयत येथे काही जण जुगार खेळत होते.तेथे जुगार खेळण्याच्या वादातून किंवा जुन्या वादातून ही हत्या झाली असावी. पंकज उर्फ भीम अशोक सपकाळे रा.विसनजी नगर, जळगाव) व राहूल सपकाळे हे दोन जण बाहेरुन दगड घेऊन जातांना माजी नगराध्यक्ष चत्रभूज सोनवणे यांच्या इमारतीमधील सीसीटीव्ही कॅमे:यात कैद झाले आहेत. राज रणछोड साळी (वय 18 रा.कांचन नगर, जळगाव) हा तरुण बुधवारी सकाळी नऊ वाजता पत्त्याच्या क्लबमध्ये साफसफाई करण्यासाठी गेला असता प्रवीणचा मृतदेह आढळून आला. ही घटना त्याने बाहेरीला लोकांना सांगितली.