चिखलात पाय फसला अन् ‘सोनू’ आयुष्याला मुकला!

By Ajay.patil | Published: September 15, 2023 07:48 PM2023-09-15T19:48:38+5:302023-09-15T19:49:10+5:30

या घटनेची माहिती मिळताच शिरसोली ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती.

youth stuck in mud and lost his life | चिखलात पाय फसला अन् ‘सोनू’ आयुष्याला मुकला!

चिखलात पाय फसला अन् ‘सोनू’ आयुष्याला मुकला!

googlenewsNext

जळगाव : तालुक्यातील शिरसोली शिवारात असलेल्या शामा फायर कंपनीमागील चांभारदरी धरणात बुडून शिरसोली येथील युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी, दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच शिरसोली ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी नातेवाईक, मित्रांनी एकच आक्रोश केला.

सोनू उर्फ सोपान संजय महाजन (वय १९, रा. शिरसोली, ता. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोनू शेतीकाम करतो. शुक्रवारी तो आपल्या दोन मित्रांसोबत चांभारदरी धरणाजवळ गेला होता. यावेळी धरणाच्या काठावर काही वेळ बसल्यानंतर सोनू पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरला. धरणात चिखल असल्यामुळे उडी मारल्यानंतर तो फसला. त्यामुळे त्याचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला. यामुळे घाबरलेल्या दुसऱ्या मित्राने आरडाओरड केली. गावातील काही मित्रमंडळी व ग्रामस्थांशी संपर्क साधून घटनेबाबत माहिती दिल्यानंतर ग्रामस्थांनी व मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. 

सोनू महाजन याला धरणाबाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोनूच्या मृत्यूची वार्ता कळताच त्याच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी झाली होती. सोनूच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

 

Web Title: youth stuck in mud and lost his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.