व्यायामाच्या साहित्यासाठी युवकांनी ग्रामसेवकास घेरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 03:22 PM2020-09-24T15:22:57+5:302020-09-24T15:25:59+5:30

१८ वर्षांपूर्वी व्यायामशाळेचे बांधकाम झाले, पण व्यायामाचे साहित्यच नसल्याने व्यायामशाळा असूनही नसल्यासारखी निरर्थक ठरत होती.

The youth surrounded the gram sevak for exercise materials | व्यायामाच्या साहित्यासाठी युवकांनी ग्रामसेवकास घेरले

व्यायामाच्या साहित्यासाठी युवकांनी ग्रामसेवकास घेरले

Next
ठळक मुद्देजामठी : अखेर व्यायामशाळेसाठी साहित्य मिळाले‘लोकमत’च्या वृत्ताचा प्रभावग्रामसेवकासह युवकांनी जळगाव गाठून खरेदी केले व्यायामाचे साहित्यसाहित्य खरेदीनंतर वादावर पडला पडदा

जामठी, ता.बोदवड : येथे सुमारे १८ वर्षांपूर्वी व्यायामशाळेचे बांधकाम झाले, पण व्यायामाचे साहित्यच नसल्याने व्यायामशाळा असूनही नसल्यासारखी निरर्थक ठरत होती. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले. ग्राम पंचायत कार्यालयात ग्रामसेवक गोविंद राठोड आले. तेव्हा गावातील युवकांनी त्यांना घेरून आधी व्यायामाचे साहित्य आणा, मगच पुढे बोला यामुळे ग्रामपंचायतीत काहीे वेळ गदारोळ झाला. अखेर ग्रामसेवक व गावातील युवक जामठीहून जळगावी गेले. तेथे एक लाखापर्यंत व्यायामाचे साहित्य खरेदी केल्यानंतर बुधवारी रात्री या विषयावर पडदा पडला.
जामठी येथे महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम (उत्तर) विभाग, जळगाव उपविभाग, बोदवड व तत्कालिन खासदार वाय.जी.महाजन यांच्या स्थानिक विकास निधीतून जामठी येथे महाराणा प्रतापसिंह व्यायामशाळेचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर ही व्यायामशाळा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत करण्यात आली. तेव्हा सुमारे तीन लाख रुपये खर्चातून व्यायामशाळेचे बांधकाम तर झाले, मात्र व्यायामाचे कोणतेही साहित्य आणण्यात आले नव्हते. व्यायामशाळा असूनही नसल्यासारखी परिस्थिती होती. परिणामी गावातील युवक भर रस्त्यावर व्यायामाचा सराव करीत होते. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने १३ सप्टेंबरच्या अंकात प्रसिद्ध झाले होते.
दरम्यान, बुधवारी दुपारी ग्रामसेवक गोविंद राठोड ग्रामपंचायत कार्यालयात आले. त्यांना चौदाव्या वित्त आयोग अंतर्गत व्यायामशाळेचे साहित्य का घेतले नाही, प्रश्न निर्माण उपस्थित करीत २५-३० युवकांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. ‘काहीही करा, आम्हाला दुसरे काही नको, व्यायामशाळेसाठी साहित्य पाहिजे. गावात २८ लाख निधी मंजूर झाला आहे. आम्हाला रस्त्यावर व्यायाम करावा लागतो आहे.’
व्यायामाचे साहित्य घेतल्याशिवाय जावू देणार नाही, अशी एकच आग्रही मागणी युवकांनी ग्रामसेवकाकडे लावून धरली. अखेर ग्रामसेवक राठोड साहित्य घेऊन देण्यास तयार झाले. उपसरपंच देवीदास पाटील, ग्रामपंचायत सदस्य नारायण संपत पाटील यांनी मुलांना साहित्य देण्यासाठी विषय लावून धरला.
अखेर ग्रामसेवक राठोड व युवक यांनी जळगाव गाठले. एक लाखापर्यंत व्यायामासाठी साहित्य घेतले. ग्रामसेवक गोविंद राठोड व उपसरपंच देविदास पाटील, ग्रामपंचायत सदस्य नारायण संपत पाटील यांचे मुलांनी आभार मानले.

Web Title: The youth surrounded the gram sevak for exercise materials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.