मित्राला फोन करुन तरुणाने घेतली जळगावात पुलावरुन उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 11:05 PM2019-06-13T23:05:24+5:302019-06-13T23:07:22+5:30

मी वाढदिवसाला येऊ शकत नाही, तुम्ही आनंद साजरा करा...असा औरंगाबादच्या मित्राला फोन करुन रुपेश ज्ञानेश्वर महाजन (२१, रा.देवगाव, ता.चोपडा) या तरुणाने विदगावच्या तापी नदीवरुन उडी घेऊन जीवन संपविल्याची घटना बुधवारी रात्री ११ वाजता घडली.लहानपणापासून आजोबांनी वाढविले. आता त्यांची प्रकृती खालावली आहे. आई, वडीलांनी सांभाळ न करता तिरस्कार केला त्यामुळे तरुणाने आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

 The youth took a call from a bridge to Jalgaon | मित्राला फोन करुन तरुणाने घेतली जळगावात पुलावरुन उडी

मित्राला फोन करुन तरुणाने घेतली जळगावात पुलावरुन उडी

Next
ठळक मुद्दे आई, वडीलांनी सांभाळ न केल्याचे कारण म्हटला, वाढदिवसाला मी येऊ शकत नाही ! सहा महिन्यापूर्वीच लागला होता कामाला

जळगाव : मी वाढदिवसाला येऊ शकत नाही, तुम्ही आनंद साजरा करा...असा औरंगाबादच्या मित्राला फोन करुन रुपेश ज्ञानेश्वर महाजन (२१, रा.देवगाव, ता.चोपडा) या तरुणाने विदगावच्या तापी नदीवरुन उडी घेऊन जीवन संपविल्याची घटना बुधवारी रात्री ११ वाजता घडली.लहानपणापासून आजोबांनी वाढविले. आता त्यांची प्रकृती खालावली आहे. आई, वडीलांनी सांभाळ न करता तिरस्कार केला त्यामुळे तरुणाने आत्महत्या केल्याची चर्चा आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश हा सहा महिन्यापूर्वीच औरंगाबाद येथे कंपनीत कामाला लागला होता. तेथे एका खोलीत तो मित्रांसोबत राहत होता. ११ जून रोजी तो औरंगाबाद येथून देवगाव येथे आजोबांकडे आला होता. औरंगाबाद येथे खोलीत राहणाºया मित्राचा वाढदिवस होता. त्यासाठी रुपेश जाणार होता. १२ रोजी त्याने रात्री मित्र राहूल तरटे याला फोन केला की, मी वाढदिवसाला येऊ शकणार नाही, तुम्ही एन्जॉय करा... असे सांगून त्याने विदगावच्या तापी पुलावरुन उडी घेतली. नदीत पाणी नसल्याने छाती व डोक्याला मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.
रस्त्यावरुन जाणाºयांनी पाहिली घटना
रुपेश नदी किनाºयावर होता. त्याच्या मनात काही तरी विचार येत असावेत असे रस्त्याने जाणाºया, येणाºयांना वाटले. तितक्यात काही कळण्याच्या आत रुपेशने पुलावरून उडी घेतली. ही माहिती लोकांनी विदगावच्या पोलीस पाटलाला कळविली. तालुका पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर बीट अमलदार साहेबराव पाटील व अरुण सोनार यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह रात्री १ वाजता जिल्हा रुग्णालयात आणला. दरम्यान, त्याच्या खिशात असलेले कंपनीचे ओळखपत्र व इतर कागदपत्रावरुन रुपेशची ओळख पटली. गुरुवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
औरंगाबादच्या मित्राला आली शंका
रुपेश याने राहूल तरटे याला फोन केल्याने त्याच्या बोलण्यातून राहूल याला संशय आला. त्याने कंपनीत काम करणारे रुपेशचे चुलत काका सोपान विक्रम महाजन यांना माहिती दिली. त्यांनी देवगाव येथे फोन करुन रुपेशचा शोध घेण्याचे सांगितले. रात्री शोध घेत असतानाच त्याने आत्महत्या केल्याची बातमी औरंगाबादला धडकली.

Web Title:  The youth took a call from a bridge to Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.