तरुणांना लुटणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:39 PM2019-04-26T12:39:17+5:302019-04-26T12:39:48+5:30
अटक करायला गेलेल्या पोलिसाशी झटापट
जळगाव : मेहरुण तलावावर बिर्याणी पार्टी करायला आलेल्या पोलिसाच्या मुलासह तिघांना चाकूचा धाक दाखवून लुटणाºया दीपक भगवान माळी (२३, रा.जाकीर हुसेन कॉलनी, जळगाव) याच्या स्थानिक गुन्हे शाखच्या पथकाने बुधवारी सायंकाळी मुसक्या आवळल्या.दरम्यान, त्याच्याकडून तीन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. त्याचा साथीदार फरार आहे.
प्रसाद भाऊसाहेब पाटील या पोलिसाच्या मुलाचा २३ फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता. त्यानिमित्त पल दिलीप लोटवाला (१९, रा. जयकिसनवाडी, जळगाव), आदित्य नारायण सूर्यवंशी व प्रसाद भाऊसाहेब पाटील असे तिघं मित्र २७ फेबुवारी रोजी रात्री पल मेहरुण तलावावर आले होते.रात्री साडे आठ वाजता मेहरुण तलावावर बिर्याणी पार्टी आटोपून घराकडे जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी ‘इतक्या रात्री तुम्ही काय करतायेत’ म्हणून तिघांना धमकावत चाकूचा धाक दाखवून पल याच्या खिशातून एक मोबाईल व चार हजार रुपये, प्रसाद याच्या खिशातून मोबाईल व १० हजार रुपये रोख तर आदित्यच्या खिशातून एक मोबाईल हिसकावून तिघांनी पळ काढला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बी. जी.रोहोम, विजय पाटील, रवींद्र गिरासे, चंद्रकांत पाटील, विजय श्यामराव पाटील, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारुळे, विकास वाघ, मिलिंद सोनवणे, सचिन महाजन व गफूर तडवी आदींचे पथक या गुन्ह्यावर काम करीत होते.
रस्ता लूट करणाºया दोघांना अटक
वित्तीय संस्थेची वसुली करुन घरी परत येणाºया कर्मचाऱ्यांना रस्त्यात अडवून त्यांच्याजवळील १ लाख ९१ हजार २०७ रुपयांची रोकड असलेली बॅग लुटून नेणाºया दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी अटक केली. मुन्ना भिमलाल बारेला (३५) व रमेश रुमाल्या बारेला (२५ दोन्ही रा.गारखेडा, ता.रावेर) अशी दोघांची नावे आहेत. अनिल जयराम बोरसे (२६, रा.धार, ता.धरणगाव) व रोहित साहेबराव आखाडे या दोघं जण ९ जानेवारी रोजी रावेर तालुक्यातील ग्रामीण भागात बचत गटाच्या हप्त्याची वसुली करण्यासाठी गेले होते. १२ केंद्रावरुन १ लाख ९१ हजार २०७ रुपयांची रोकड घेऊन हे दोघं दुचाकीने परत येत लालमाती ते अभोडा दरम्यान रसलपुरकडे जाणाºया रस्त्यावर दोघांना दुचाकीवरुन खाली पाडून त्यांच्याजवळील बॅग घेऊन पळ काढला होता.
पोलिसाशी घातली हुज्जत
दीपक माळी हा गाडगेबाबा चौक परिसरात एका मंदिराजवळ असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे विजय श्यामराव पाटील यांना मिळाली होती.त्यानुसार पाटील व सचिन महाजन हे दोघंही तातडीने तेथे पोहचले असता, त्याने पोलिसांना ओळखले नाही. नंतर पोलीस असल्याचे समजताच त्याने हुज्जत घालून विजय पाटील यांच्याशी झटापट करुन पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तो दोघांनी हाणून पाडला. या कर्मचाºयांनी नंतर पथक बोलावून घेतले. दीपक हा सराईत गुन्हेगार आहे.