चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर युवक घालताहेत गस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:19 AM2021-09-22T04:19:12+5:302021-09-22T04:19:12+5:30
अमळनेर : तालुक्यातील चौबारी येथे सलग झालेल्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर सहायक पोलीस निरीक्षक जयेश खलाने यांनी केलेल्या आवाहनानुसार गावातील ...
अमळनेर : तालुक्यातील चौबारी येथे सलग झालेल्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर सहायक पोलीस निरीक्षक जयेश खलाने यांनी केलेल्या आवाहनानुसार गावातील ५० ग्रामसुरक्षा दलाचे तरुण रात्री १ ते ५ या वेळेत गस्त घालत आहेत.
एपीआय जयेश खलाने यांनी ज्येष्ठ नागरिकांची आणि तरुणांची बैठक घेतली असून, गावात ग्राम सुरक्षा दल स्थापन केले आहे. चोरीला आळा बसावा म्हणून ५० तरुणांचे गस्त पथक तयार करण्यात आले आहे. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक खलाने यांनी गुरे चोरीचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी गुरांच्या गळ्यात घंटा बांधा, तसेच गुरे दिसू शकतील अशा ठिकाणी बांधा, घर, वाडा, गोठा यांचे जीर्ण दरवाजे दुरुस्त करून घ्या, लोकसहभागातून ग्रामपंचायतीने गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत, अशा सूचना ग्रामस्थांना केल्या आहेत.
यावेळी त्र्यंबक पाटील, खुशाल महाजन, पोलीस पाटील भावना पाटील, विजय पाटील, यासह ग्रामस्थ उपस्थित होते.