भडगावातील तरुणांनी सापडलेले ४५ हजार एटीएम कार्डसह केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 05:10 PM2021-05-09T17:10:25+5:302021-05-09T17:10:57+5:30
भडगावातील तरुणांचाही असाही प्रामाणिकपणा समाजासमोर आहे.
भडगाव : एटीएम केंद्राजवळ सापडलेले ४५ हजार रुपये व एटीएम कार्ड शहरातील मुजाहीद कुरेशी व रिजवान कुरेशी दोन या युवकांनी बात्सर येथील दीपक शिंदे यांना परत करून पवित्र रमजान महिन्यात माणुसकीचे दर्शन घडविले.
सामाजिक कार्यकर्ते तथा माऊली फाऊडेशनचे सक्रीय सदस्य हाजी जाकीर कुरेशी यांचे पुतणे रिजवान महेबूब कुरेशी, मुजाहीद अ. अलाहत कुरेशी हे सायंकाळी खोलगल्ली भागात असलेल्या स्टेट बॕकेच्या एटीएममध्ये गेले होते. त्यांना गुरुदत्त बेकरीजवळ एका कापडी पिशवीत जेडीसीसी बॕकेचे दोन एटीएम, पाचशेच्या नोटा बंडल असलेली ४५ हजार पाचशे रुपये रक्कम सापडली. त्यांनी ती माहिती त्याचे काका हाजी जाकीर कुरेशी यांना दिली. रक्कम व एटीएम कार्ड त्यांच्याकडे सुपूर्द केली केले. हाजी जाकीर कुरेशी यांनी ही रक्कम भडगाव पोलीस स्टेशला पोलीस उपनिरीक्षक अनंत पटारे यांच्याकडे जमा करत ज्याची कोणाची असेल त्याची ओळख पटवून देण्याचे सांगितले.
दरम्यान, हाजी जाकीर कुरेशी यांनी याबाबतचा ४५ हजार रुपये सापडल्याचा मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध वाॕटसअॕप ग्रुपवर पाठविला होता. हा मेसेज बात्सर येथील सचिव दीपक शिंदे यांनी वाचून पोलिसांकडे धाव घेत पैसे हरविल्याबाबत सांगितले.
४५ हजार पाचशे रुपये, एटीएम कार्ड ओळख पटवून परत करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक आनंद पठारे, सुशील सोनवणे, हाजी जाकीर कुरेशी, माजी नगरसेविका योजना पाटील, सोनू खाटीक, भिकन महाजन आदी उपस्थित होते.