युवकांनो नोकरी मागणारे नव्हे देणारे व्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 05:52 PM2017-12-25T17:52:39+5:302017-12-25T17:57:54+5:30

जळगावात सुरु असलेल्या अभाविपच्या अधिवेशना दरम्यान चर्चासत्रातील सूर

Youths Do not Want to Find a Job ... | युवकांनो नोकरी मागणारे नव्हे देणारे व्हा...

युवकांनो नोकरी मागणारे नव्हे देणारे व्हा...

Next
ठळक मुद्देउद्योजक होण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ घ्या-पेशकारविद्यार्थ्यांनी संकल्पना समजून अभ्यास करावा-प्रा.साठेनोकरी मागणारा बनण्यापेक्षा नोकरी देणारा बनावे

आॅनलाईन लोकमत
जळगाव , दि. २५ : युवकांनी रोजगाराची संधी मिळेल याची वाट बघत न बसता स्वत:मध्ये कौशल्य विकसित करून, शासकीय योजनांचा अभ्यासपूर्वक लाभ घेऊन स्वत:चा उद्योग सुरू करावा. नोकरी मागणारा बनण्यापेक्षा नोकरी देणारा बनावे, असा सूर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिवतीर्थ मैदानावर सुरू असलेल्या ५२ व्या प्रदेश अधिवेशनात सोमवार, २५ डिसेंबर रोजी सकाळी आयोजित चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केला. अधिवेशनाचा आज दुसरा दिवस होता.
‘सुशिक्षत बेरोजगारी-समाजापुढील एक आव्हान आणि उपाय’ हा या चर्चासत्राचा विषय होता. त्यात राष्टÑीय सहसंघटनमंत्री जी.लक्ष्मण, माजी राष्टÑीय अध्यक्ष मिलिंद मराठे, आनंद कोठारी, प्रमुख अतिथी प्रदीप पेशकार, प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ.प्रशांत साठे, प्रदेशमंत्री अभिजित पाटील, स्वागत समिती सदस्य गिरीश कुलकर्णी सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांनी संकल्पना समजून अभ्यास करावा-प्रा.साठे
प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ.प्रशांत साठे म्हणाले की, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण झाले की, रोजगाराची संधी मिळावी, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा असते. मात्र रोजगार मिळणे ही काही जादूची कांडी नाही. ही एक प्रक्रिया, पद्धती असते. विद्यार्थ्यांना त्या-त्या विषयाबाबतच्या संकल्पना स्पष्ट करणारे शिक्षण मिळतेय की नाही? माहिती नाही. मात्र आपण ते शिक्षण घेत नाही हे निश्चित. संकल्पना समजून घेतली पाहिजे. तरच रोजगार मिळेल. परिषद त्यासाठीच कार्य करणार आहे. नोकरीसाठीची पात्रता वाढविण्याच्या शक्यतेत अभाविपचे काम १०० टक्के महत्वाचे ठरेल. सरकारवर टीका करून अथवा मागणी करून नोकरी मिळणार नाही. तर नोकरी मिळविण्यासाठी आपलीही क्षमता हवी, असे सांगितले.

उद्योजक होण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ घ्या-पेशकार
प्रदीप पेशकार म्हणाले, नकारात्मकता बाजूला ठेवून सकारात्मक विचार करीत मी काय करू शकतो? हा या अधिवेशनातून घेऊन जाण्याचा मुद्दा आहे. जेवढे प्रयत्न सरकार, समाज करते, त्यापेक्षा दुप्पट प्रयत्न आपण स्वत: केले पाहिजे. सरकारी योजना आपल्यासाठी नाही, अशी भावना आपल्यात असते. त्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा हे देखील आपल्याला माहित नसते. जर शासकीय योजनांची व्यवस्थित माहिती घेतली व आपल्याला काय करावयाचे आहे? आपल्यातील कोणते कौशल्य आहे? ते निश्चित करून व्यवसाय करावयाचे ठरविल्यास शासकीय योजनेतून त्यास निश्चितपणे मदत मिळू शकते. त्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये शासकीय योजनांची माहिती देणारे अ‍ॅप डाऊनलोड करून घ्या, असे आवाहन केले.

Web Title: Youths Do not Want to Find a Job ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव