जामनेरला युवासेनेने काढली कापसाची अंत्ययात्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 05:07 PM2023-05-29T17:07:00+5:302023-05-29T17:10:05+5:30

जामनेरातील नगरपालिका चौकात कापसाची तिरडी तयार करून चार जणांनी खांद्यावर घेतली.

Yuva Sena took out funeral procession of cotton to Jamner | जामनेरला युवासेनेने काढली कापसाची अंत्ययात्रा

फोटो : जामनेर येथे कापसाच्या अंत्ययात्रेत सहभागी युवा सेनेचे पदाधिकारी.

googlenewsNext

मोहन सारस्वत -

जामनेर : कापसाला भाव मिळत नसल्याने युवासेनेच्या वतीने (ठाकरे गट) सोमवारी जामनेरात कापसाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. शेतकऱ्यांचा अंत न पाहता शासनाने कापसाला भाव द्यावा, अन्यथा दहा दिवसानंतर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

जामनेरातील नगरपालिका चौकात कापसाची तिरडी तयार करून चार जणांनी खांद्यावर घेतली. कापसाला भाव मिळाला पाहिजे, भाव देणे शक्य नसेल तर पेरणीसाठी प्रति एकर ५ हजार अनुदान द्यावे, शासनाने शेतकऱ्यांचा विमा काढावा, बाजार समितीत हमी भावाने शेती मालाची खरेदी करावी, या मागण्याचे निवेदन तहसीलदार नानासाहेब आगळे यांना देण्यात आले.

यावेळी युवासेना (उद्धव ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख राहुल चव्हाण, तालुका प्रमुख नरेंद्र धुमाळ, विशाल जंजाळ, भैया गुजर, अतुल सोनवणे, सुरेश चव्हाण, मनोज मिस्तरी, सईद शेख, मयूर पाटील, अनिल चौधरी, भूषण कानळजे, योगेश गोसावी, सागर साठे यांचेसह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
 
 

Web Title: Yuva Sena took out funeral procession of cotton to Jamner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.