युवाचार्य प.पू. महेंद्रऋषी महाराज यांचा ‘ श्रुतमहोदधी’  पदवीने सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 07:09 PM2021-01-05T19:09:19+5:302021-01-05T19:10:36+5:30

युवाचार्य प.पू. महेंद्रऋषी महाराज यांचा ‘ श्रुतमहोदधी’  पदवीने सन्मान करण्यात आला.

Yuvacharya P.P. Mahendrarishi Maharaj honored with the title of 'Shrutamhodadhi' | युवाचार्य प.पू. महेंद्रऋषी महाराज यांचा ‘ श्रुतमहोदधी’  पदवीने सन्मान

युवाचार्य प.पू. महेंद्रऋषी महाराज यांचा ‘ श्रुतमहोदधी’  पदवीने सन्मान

Next
ठळक मुद्देवाकोद येथे श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्यावतीने अभिनंदन समारंभउपस्थित सर्वांच्या डोक्यावर राजस्थानी पगडी, तोंडावर मास्क व गळ्यात जैन रंग प्रतीक असलेले वस्त्र

वाकोद, ता.जामनेर : कृषी क्षेत्रात आपल्या कार्याचा जागतिक पातळीवर ठसा उमटविला असे पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन हे ऋषभदेव यांच्या असी, मसी आणि कृषी या तिघांचे मोठे अनुयायी होते. आज जैन परिवाराची गंगोत्री असलेल्या वाकोद नगरीत हा अभिनंदन समारोह महत्त्वाचा समजतो; असे विचार प.पू. महेंद्रऋषीजी म.सा. यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले. वाकोद येथील हिराहस्ती समाज मंदिरात प्रज्ञामहर्षी युवाचार्य प.पू. महेंद्रऋषीजी महाराज यांचा ‘दिव्यपद सन्मान’  समारंभ ५ रोजी जळगाव जिल्हा श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने आयोजित केला होता. या प्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमास सेवादास दलिचंद जैन, कविवर्य ना.धों. महानोर, रमेश जैन, प्रदीप रायसोनी, अशोक जैन, अमर जैन, प्रकाश समदडिया आदी मान्यवर उपस्थित होते. 
उपस्थित सर्वांच्या डोक्यावर राजस्थानी पगडी, तोंडावर मास्क व गळ्यात जैन रंग प्रतीक असलेले वस्त्र होते.
प्रज्ञामहर्षि, आगमज्ञाता युवाचार्य प्रवर परमपूज्य श्री. महेंद्रऋषीजी म. सा., उपप्रवर्तक परमपूज्य श्री. अक्षयऋषीजी म.सा.आदी ठाणा पाच यांचा जळगाववासीयांना चातुर्मासाचा सहवास लाभला होता. चातुर्मास पश्चात जळगावहून विहार करून वाकोद येथे संत आदि ठाणा पाच विराजमान झाले. यानिमित्ताने जिल्हा श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघातर्फे युवाचार्य प.पू. महेंद्रऋषी महाराज यांना  ‘श्रुतमहोदधी’ पदवी देऊन मानपत्र प्रदान करण्यात आले. सेवादास दलीचंद जैन, रमेश जैन यांच्याहस्ते संतद्वयांना चादर ओढण्यात आली. कान्हदेश शिरोमणी-उपप्रवर्तक अक्षयऋषी यांनाही आदराची चादर ओढण्यात आली.
आरंभी अपूर्वा राका, मीनल समदडिया, ममता कांकरिया यांनी मंगलाचरण म्हटले. प.पू. अचलऋषी महाराज, प्रकाश समदडीया, प.पू. अमृतऋषी महाराज, महावीर गोलेछा, हितमीत भाषी प.पू. हितेंद्रऋषी म. सा. ताराबाई डाकलिया, ईश्वरलाल साबद्रा, नागपूर श्री संघाचे सदस्य कांतीलाल श्रीश्रीमाळ यांनी मनोगत व्यक्त केले. जळगाव येथील श्राविका ताराबाई रेदासनी यांनी गीतातून भावना व्यक्त केल्या.
सेवादास व जैन परिवाराचे ज्येष्ठ सदस्य दलीचंद जैन यांनीही मनोगत व्यक्त केले. 
युवाचार्य प. पु. महेंद्रऋषी महाराज साहेब लिखित 'मुनी गुणमंगलमाला' पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकासाठी दीपक ओस्तवाल यांचे सहकार्य लाभले. मानपत्र वाचन नितीन चोपडा यांनी केले. अपूर्वा राका यांनी सूत्रसंचालन केले. 

Web Title: Yuvacharya P.P. Mahendrarishi Maharaj honored with the title of 'Shrutamhodadhi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.