‘युवारंग’मध्ये मनोरंजनातून सामाजिक जाणिवांवर प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 11:34 PM2020-01-25T23:34:00+5:302020-01-25T23:34:16+5:30

उत्साह, जल्लोष आणि भारलेल्या वातावरणात नुकताच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा युवारंग महोत्सव नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे पार पडला़ पाच दिवस तरुणाईचे होते़ हे पाचही दिवस अक्षरश: तरुणाईने गाजविले़ यात कलाकारांना डोक्यावर घेतले होते़ त्यात कुळी कन्या, पुत्र होतीजे सात्त्विक या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे इथेही मान-सन्मान मिळविला तो मुलींनाचं़ केवळ धांगडधिंगा केंद्रस्थानी न ठेवता या पाच दिवसात विद्यार्थ्यांमधील कलाकारांनी सामाजिक जागृती व ज्वलंत विषयांवर आपल्या विविध कलेच्या माध्यमातून प्रकाश टाकला़ त्यामुळे अन्य युवारंगांपेक्षा हे या युवारंगाचे एक वेगळे वैशिष्ट्य ठरले़

'Yuvaranga' focuses on entertainment through social media | ‘युवारंग’मध्ये मनोरंजनातून सामाजिक जाणिवांवर प्रकाश

‘युवारंग’मध्ये मनोरंजनातून सामाजिक जाणिवांवर प्रकाश

Next

जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे दरवर्षी विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचा ‘युवारंग’ महोत्सव आयोजित केला जातो़ मागील दोन वर्ष हा महोत्सव जिल्हास्तरावर झाला़ पुन्हा हा महोत्सव पाच दिवसांचा व्हावा ही विद्यार्थ्यांची मागणी जोर धरू लागल्यानंतर विद्यापीठाने विद्यार्थी केंद्र बिंदू मानून पुन्हा अविस्मरणीय ठरणारा खान्देशस्तरावर घेतला़ आणि तो उत्साहात व कुठेली विघ्न न येता पारही पडला़ अनेकांना खटकलेली कुलगुरूंची अनुपस्थिती वगळता, बाकी सर्व सुरळीत झाले, तर दुसरीकडे संगीत, नृत्य, साहित्यकला, नाट्यकला व ललितकला या पाच कला प्रकारात कलाकार विद्यार्थ्यांनी त्यांचे कलागुण उत्कृष्ट पद्धतीने मांडले़ विद्यार्थ्यांनी पारंपरिकतेवर भर देत संस्कृती जपली व तिचे त्याच तन्मयतेने तसेच अत्यंत उत्कृष्टतेने सादरीकरणही केले़ या सादरीकरणाने सर्वांचे मनही जिंकले़
समाजातील चर्चेत असलेले ज्वलंत विषय विद्यार्थ्यांनी विविध कलांच्या माध्यमातून अत्यंत सहजतेने प्रेक्षकांच्या समोर मांडले़ यात महिला सुरक्षा, मोबाईलचा अतिरेकी वापर, नागरिकत्व कायदा, हुंडा बळी, स्त्रीभू्रण हत्या या विषयांना वाचा फोडली़ प्रेक्षकांनीही दाद देऊन या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले़ हैद्राबादमधील अत्याचार प्रकरण मूकनाट्यातून मांडून विद्यार्थ्यांनी उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणले होते़ केवळ मांडणीचं नव्हे तर विद्यार्थ्यांचा अभिनयही प्रत्येक कलाप्रकारात लक्ष वेधून घेत होता़ हे युवारंगाचे एक वैशिष्ट्य म्हणता येईल़ खान्देशातील सुप्त कलागुणांना या युवारंगातून खरंच न्याय व वाव मिळाल्याचा प्रत्यय प्रत्येक प्रेक्षकाला यावेळी आला़ विशेष म्हणजे नेहमीच महाराष्ट्रातीलच नव्हे तर इतर राज्यातील जे प्रचलित कलाप्रकारही विद्यार्थ्यांनी सादर केले़ त्यामुळे देशातील पारंपरिक संस्कृती प्रेक्षकांपर्यंत सुलभतेने पोहोचली़
जेवणाने केला ‘मूड आॅफ’
अत्यंत उत्साहात असलेल्या विद्यार्थ्यांचा जेवणात असलेल्या त्याच-त्याच मेनूमुळे ‘मूड आॅफ’ झाल्याचेही जाणवले़ अन्य व्यवस्था उत्तम होती़ पाच रंगमंचांवर एकावेळी विविध कलाप्रकार सादर केले जात होते़ प्रेक्षक प्रत्येक कलाप्रकार बघण्यासाठी सारखीच गर्दी उसळली होती़ विद्यार्थ्यांचे स्रेहसंमेलन म्हटले की, धांगड-धिंगा, धम्माल़, मस्ती, जल्लोष अन् असतो तो पोलीस बंदोबस्त़ आधीच विद्यापीठात काही दिवसांपूर्वी काही विद्यार्थी संघटनांनी केलेली आंदोलने या पार्श्वभूमीवर युवारंगावरही आंदोलनाचे सावट होते़ मात्र, संघटनांनीही या कला महोत्सवात कुठलाही अनुचित प्रकार घडू दिला नाही़ हे मात्र कौतुकास्पद म्हणता येईल़ अडीच हजार विद्यार्थ्यांच्या निवासस्थानाची व्यवस्था शहाद्यातील पूज्य साने गुरुजी मंडळ संचलित कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाकडून करण्यात आली़ अन् कुठलीही तक्रार ऐकायला मिळाली नाही़ हेसुद्धा उत्तम नियोजनाचे फलीत होते़
़़.आणि डोळ्यांचे पारणे फेडले
महोत्सवाच्या शेवटच्या दोन दिवसांनी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची पारणे तर फेडलीच पण प्रत्येक कलाप्रकाराचा विद्यार्थ्यांनी आनंद लुटला़ पारंपरिक नृत्य, शास्त्रीय नृत्यातून संपूर्ण ‘भारत’ रंगमंचांवर अवतरला होता, तर छायाचित्र स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी आपल्या कलेचा चमत्कार दाखविला आणि मग शेवटचा उगवला अन् तो दिवस ठरला अविस्मरणीय. तो म्हणजे मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिच्या अदांवर संपूर्ण तरुणाई फिदा झाली होती़ तिच्यासोबतचा क्षण टिपण्यासाठी एकाने तर चक्क रंगमंचावर धाव घेत सेल्फी घेतला़ परंतु, त्याच्या चुकीची त्याला क्षमादेखील मागावी लागली़ यामुळे जर आयुष्यात चूक केली तर त्यासाठी क्षमा मागितली तर आपल्याला कुणीही माफ करून देते हे यातून दाखवून देण्यात आले़ पारितोषिक वितरणाला ज्यांना बक्षीस मिळाले त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होते तर ज्यांना मिळाले नाही, त्यांच्या मात्र चेहºयावर साफ निराशा दिसून आली़ मात्र, हा पराभव स्वीकारून खिलाडू वृत्तीने विद्यार्थी कलाकारांनी तेवढ्याच उत्साहात या पाच दिवसाच्या उत्सवाचा समारोप केला़
-सागर दुबे, जळगाव

Web Title: 'Yuvaranga' focuses on entertainment through social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.