झांबरे विद्यालय आणि अनुभूती स्कूल विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 01:12 AM2017-09-20T01:12:03+5:302017-09-20T01:14:03+5:30

Zambre School and Anubuti School won | झांबरे विद्यालय आणि अनुभूती स्कूल विजयी

झांबरे विद्यालय आणि अनुभूती स्कूल विजयी

Next
ठळक मुद्दे३५ तेजस कोळी याने केलेल्या ३५ धावांच्या जोरावर झांबरे विद्यालयाने सोपा विजय साकारला३९ पोदार स्कूलच्या गोलंदाजांनी अवांतर धावा दिल्या. त्यामुळे अनुभूती स्कूलचा विजय सोपा झाला.३ संयम वेद याने ३ गडी बाद करत अनुभूतीला विजय मिळवून दिला.

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जैन स्पोर्ट्स अकॅडमी आणि जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या १३ व्या जैन ज्युनियर चॅलेंज चषक क्रिकेट स्पर्धेत ए.टी.झांबरे विद्यालय आणि अनुभूती स्कूलने विजय मिळवला. 
मंगळवारी अनुभुती स्कूलच्या मैदानावर सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात झांबरे विद्यालयाने रायसोनी स्कूलचा २ गडी राखून पराभव केला.  रायसोनी स्कूलने प्रथम फलंदाजी करताना १८.४ षटकांत सर्वबाद ७६ धावा केल्या. त्यात अर्पित शुक्ला याने ३५ धावांचे योगदान दिले. त्याशिवाय एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. झांबरे विद्यालयाच्या आतिक तडवी याने सर्वाधिक ३ गडी बाद केले. चैतन्य बडगुजर आणि यश शिरसाळे यांनी प्रत्येकी २ गडी बाद करत त्याला साथ दिली. 
प्रत्युत्तरात विजयासाठी आवश्यक असलेले ७७ धावांचे आव्हान झांबरे विद्यालयाने १९.३ षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. सामनावीर तेजस कोळी याने सर्वाधिक नाबाद ३५ धावा आणि मनीष लाडने नाबाद ७ धावा केल्या. रायसोनी स्कूलच्या संस्कार भावसार याने ११ धावा देत सर्वाधिक ४ गडी बाद केले.  विवेक सावंत याने २, तर आलोक शाह आणि प्रतीक द्विवेदी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. 
दुसºया सामन्यात अनुभूती स्कूलने पोदार इंटरनॅशनल स्कूलविरुद्ध २५ षटकांत ८९ धावा केल्या. सचिन पाटील याने १४ आणि मानस चौहान याने १३ धावांचे योगदान दिले. मात्र पोदार स्कूलच्या गोलंदाजांनी दिलेल्या अवांतर ३९ धावांमुळे अनुभूती स्कूलच्या धावसंख्येत मोठी भर पडली. पोदार स्कूलच्या सर्वेश देसले, सिद्धांत हरणे, देवराज भांडारकर आणि जयवीर परिहार यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात पोदार स्कूलचा संघ १६ षटकांत ४९ धावांवर तंबूत परतला. अनुभूती स्कूलच्या संयम वेद याने ३ गडी बाद केले.वीरेंद्र गट्टानी याने २ गडी बाद करत त्याला साथ दिली. विवेक सुराणा आणि वेदांत राठोर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. 

Web Title: Zambre School and Anubuti School won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.