पासर्डीजवळील कारगिल वस्तीत झाेपडीला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 04:33 PM2020-12-18T16:33:29+5:302020-12-18T16:33:29+5:30
पासर्डी जवळील कारगिल वस्तीतील झोपडीस आग लागून त्यातील रोख रकमेसह संपूर्ण घर सामान अंदाजे एक लाखाचे नुकसान झाले.
Next
क गाव, ता.भडगाव : पासर्डी जवळील कारगिल वस्तीतील झोपडीस आग लागून त्यातील रोख रकमेसह संपूर्ण घर सामान अंदाजे एक लाखाचे नुकसान झाले. कजगावचे मंडळ अधिकारी, तलाठी यांनी नुकसानीचा पंचनामा केला पासर्डी येथील कारगिल वस्तीतील भावडू जंगलू भिल यांच्या घराला (झोपडीला) अचानक आग लागली. त्यात त्यांची एक लहान मुलगा कार्तिक (वय ६) व एक मुलगी सरला (वय ४) हे घरात खेळत असताना अचानक धूर निघू लागला. काही वेळातच आग सुरू झाल्याने हे लहान बालके बाहेर पळाल्यामुळे बचावली, अन्यथा मोठा अनर्थ येथे घडला असता. वडील भावडू भिल कामावर गेले होते तर आई बाहेर काही काम करत होती. घरावर उसाचा चारा सुकलेला (पाचाड) असल्याने तो पेटल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात लागली. आगीत मोलमजुरीचे जमलेले अंदाजे १० हजार रुपये टीव्हीसह संपूर्ण घर संसार जळून खाक झाला. यामुळे कुटुंब उघड्यावर आले आहे. केवळ अंगावर घातलेली कपडे शिल्लक राहिले आहेत. वस्तीवर रहाणाऱ्या नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. सरपंच बाळू काशिनाथ पाटील, कजगाव भागचे मंडळाधिकारी राजू शेजवलकर, तलाठी उमेश पाटील, कोतवाल नितीन मोरे, भगवान भास्कर पाटील हे घटनास्थळी हजर होते. सर्कल व तलाठी यांनी पंचनामा केला. नुकसानग्रस्त भावडू भिल यांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी होत आहे