जिल्हा बँक : अखेर गुलाबराव देवकरांसह सोनवणेंचाही राजीनामा, नवीन पदासाठी इच्छूकांमध्ये स्पर्धा
By सुनील पाटील | Published: February 7, 2023 01:54 PM2023-02-07T13:54:24+5:302023-02-07T13:55:12+5:30
Jalgaon News: जिल्हा बॅकेचे चेअरमन गुलाबराव देवकर व व्हाईस चेअरमन श्यामकांत सोनवणे यांनी मंगळवारी आपल्या पदाचे राजीनामे सादर केले.
- सुनील पाटील
जळगाव - जिल्हा बॅकेचे चेअरमन गुलाबराव देवकर व व्हाईस चेअरमन श्यामकांत सोनवणे यांनी मंगळवारी आपल्या पदाचे राजीनामे सादर केले. बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्याकडे दोघांनी राजीनामे दिले. कार्यकारी संचालकांकडून हे राजीनामे सहनिबंधक (सहकार) नाशिक यांच्याकडे पाठविले जातील, त्यानंतर पंधरा दिवसाच्या आता चेअरमन निवडीचा कार्यक्रम जाहीर होईल.
गेल्या आठवड्यात जिल्हा बँकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने गुलाबराव देवकर व श्यामकांत सोनवणे यांनी राजीनामा द्यावा यावर एकमत झाले होते. त्यानुसार दोघं जण सोमवारी राजीनामे देतील, असे एकनाथ खडसे यांनी जाहीर केले होते. मात्र दोघांपैकी कोणीही राजीनामा दिला नाही, त्यामुळे वेगवेगळ्या तर्कांना उधान आले होते. दिवसभरात झालेल्या घडामोडीनंतर मंगळवारी दोघांनी राजीनामे सादर केले. नव्या चेअरमनपदासाठी राष्ट्रवादीत चढाओढ असून व्हाईस चेअरमनपदाबाबत देखील अशीच परिस्थिती आहे.