जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प ६० टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:15 AM2021-03-20T04:15:43+5:302021-03-20T04:15:43+5:30
जळगाव : जिल्हा परिषदेचा २०२१, २२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प हा कोरोनामुळे शिवाय उत्पनाचे स्रोत न वाढल्यामुळे घटून थेट ...
जळगाव : जिल्हा परिषदेचा २०२१, २२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प हा कोरोनामुळे शिवाय उत्पनाचे स्रोत न वाढल्यामुळे घटून थेट ६० टक्क्यांकर आला आहे. यंदाचा नियोजित अर्थसंकल्प १५ कोटींचा असून २२रोजी हा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. विशेष सभेत त्याला मंजुरी मिळणार आहे.
२२ मार्च रोजी जि. पच्या अर्थसंकल्प विशेष सभेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. या वेळी अर्थ समिती सभापती तथा उपाध्यक्ष लालचंद पाटील हा अर्थसंकल्प मांडणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदाचा अर्थसंकल्प हा १५ कोटींचा आहे. गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प हा २५ कोटी ९४ लाख ४५ हजार इतका होता. १० कोटींपर्यंतची यात कपात झाली आहे. शिवाय यंदा खर्च १६ कोटी असल्याने १ कोटींची तूट राहणार आहे, हा अंदाजित असून यात २२ मार्चच्या सभेत मान्यता मिळणार आहे
अशी आहे अंदाजित तरतूद
आरोग्य: यंदा २१ लाख , मागील ३४ लाख,
बांधकाम : यंदा १ कोटी ३० लाख, मागील २ कोटी ९० लाख
सिंचन : यंदा १४ लाख, मागील १ कोटी ४ लाख
शिक्षण: यंदा ८० लाख ५०हजार, मागील १ कोटी ३१ लाख
पाणी व स्वछता : यंदा २ कोटी ६९लाख, मागील ३ कोटी ७२ लाख
महिला व बालकल्याण : यंदा ८० लाख ४५ हजार, मागील ८९लाख ४५
कृषी: यंदा ९९ लाख १० हजार, मागील १ कोटी ९१ लाख ९५
प्राधान्य कशाला?
पंचायत राज साठी यंदा ४ कोटी २९ लाख तरतूद ठेवण्यात आली आहे. यात अधिकारी वाहन, दौरे यांचायवर हा खर्च होणार आहे. दुसरीकडे आरोग्यावर केवळ २१ लाख तरतूद असल्याने मोठा विरोधाभास यातून समोर आला आहे. यात बदल करण्याबाबत मागणी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे, या मुद्द्यांवरून सभा गाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोट
गेल्या चार वर्षांपासून छापखाना, सोलर पॅनल, गुणवत्ता प्रयोगशाळा, व्यापारी गाळे अशी अनेक कामे उत्पन्न वाढीसाठी आम्ही प्रत्येक सभेत सुचवीत आहोत, मात्र त्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. असेच सुरू राहील तर कदाचित पुढील वर्षी, अधिकारी यांच्या वाहनात डीझहेल टाकायला पण पैसा राहणार नाही- नानभाऊ महाजन, सदस्य शिवसेना