जिल्हा परिषदेत अंधळा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 09:33 PM2018-10-13T21:33:51+5:302018-10-13T21:35:36+5:30
पदाधिकारी आणि अधिकाºयांमध्ये समन्वय नाही
ठळक मुद्देसदस्यांनी कोणाकडे पहावे?
ह तेंद्र काळुंखेजळगाव: गेल्या दिड वर्षात जिल्हा परिषदेत पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यात समन्वय राहिलेला नाही. यामुळे विविध कामे वेळेवर होत नसल्याचे दिसून येत आहे. एवढेच नाही तर एकूण कारभार हा अंधळेपणाने चालल्याचे उदाहरण नुकतेच समोर आले आहे.या प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या कारभाराबाबत आता चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे, असेच म्हणावे लागणार आहे. भूसंपादन प्रकरणात जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास निधीची अडीच कोटी इतकी रक्कम न्यायालयाच्या आदेशाने संबंधित शेतकºयांना देण्यासाठी थेट वर्ग करण्यात आली. मात्र याची जिल्हा परिषदेच्या कोणत्याही पदाधिकाºयांना खबरही नसल्याचा प्रकार शनिवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत समोर आला. विरोधकांनी हा मुद्दा मांडला. मात्र पदाधिकारी आणि अधिकारीही अनभिज्ञ होते. याबाबत मात्र कोणतीही प्रतिक्रिया पदाधिकाºयांकडून उमटली नाही किंवा त्याचा पाठपुरावा झाला नाही. दुसरी बाब अशी की, जिल्हा परिषदेचे स्वमालकीचे २० गाळे असून थकबाकी वसुुलीसाठी जि.प. कडून हे गाळे ताब्यात घेतले जाणार होते मात्र १८ जण न्यायालयात गेल्याने ही कारवाई करता आली नाही. परंतु दोघे जण न्यायालयात न गेल्याने ते दोन गाळे ताब्यात घेता आले असते परंतु अधिकाºयांमध्ये उदासिनता असल्याने ही कार्यवाही झाली नाही. मुळातच थकबाकी वसुलीची कार्यवाही ही खूपच उशिरा सुरु करण्यात आली. अधिकारी भान ठेवूृन काम करीत नाही आणि पदाधिकारी पूर्ण लक्ष घालत नाही, अशी अवस्था असून जि. प. चा कारभार केव्हा सुधरणार हा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. यावर कडी म्हणजे अधिकाºयांनी पदाधिकाºयांना नियंत्रणात ठेवण्याचे काम करायला हवे असे असताना पदाधिकाºयांकडूनच अनेकदा अधिकारी ऐकत नाही, अशा तक्रारी होतात. यामुळे इतर सदस्यांनी कोणाकडे पहावे? असा सवालही व्यक्त होवू लागला आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत पदाधिकाºयांनीच विविध कामाच्या फाईल्सची आवक - जावक रजिस्टर मध्ये नोंद न होता या फाईल्सचा अंधाधुंद प्रवास होत असल्याच मुद्दा मांडून जि.प. तील अंधळा कारभार स्वत:च उघड केला आहे. यावर सूचना नियमानुसार फाईल्सचा प्रवास व्हावा,अशी सूचना केली आहे. परंतु आतापर्यंत पदाधिकाºयांच्या अनेक सूचना हवेतच विरल्याची अनेक प्रकार आहेत. यामुळे आता या सूचनेचे पालन होते की नाही याबाबतही शंका निर्माण होते. अशा या गंभीर स्थितीवर कठोर इलाज होणे गरजेचे आहे.