जळगावात छेडखानी करणाऱ्या जि.प. कर्मचा-यास चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 07:44 PM2018-06-30T19:44:27+5:302018-06-30T19:47:46+5:30
जिल्हा परिषदेत एका कर्मचा-याकडून महिला कर्मचाºयाच्या छेडखानीचा प्रकार वारंवार घडत असताना या कर्मचाºयास संबधित महिलेच्या तक्रारीनंतर चांगलाच चोप मिळाल्याची घटना शुक्रवारी घडली.
जळगाव- जिल्हा परिषदेत एका कर्मचा-याकडून महिला कर्मचाºयाच्या छेडखानीचा प्रकार वारंवार घडत असताना या कर्मचाºयास संबधित महिलेच्या तक्रारीनंतर चांगलाच चोप मिळाल्याची घटना शुक्रवारी घडली.
जिल्हा परिषदेतील कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून सोबतच काम करणा-या महिला कर्मचा-याला त्रास देत होता. दोन- तीन महिन्यापूर्वी या महिलने संबधित कर्मचा-यास चप्पल दाखवून समज दिली होती. मात्र तरीही त्याची रोमिओगीरी कमी झाली नाही. अखेर कंटाळून या महिलेने शुक्रवारी दुपारी थेट पोलीस स्टेशन गाठले.
पोलिसांंनी या कर्मचा-यास व त्याची आई आणि पत्नीसही पोलीस स्टेशनला बोलावून घेतले. याच दरम्यान जि.प.च्याच एका विभाग प्रमुखाचा फोन पोलिसांना आल्यानंतर संबंधित कर्मचा-याच्या नोकरीवर गदा येवू नये म्हणून सहमतीने हे प्रकरण येथेच मिटविण्यात आले. मात्र त्यास चांगलचाच चोपही देण्यात आला.