जि.प. अर्थसंकल्प २१ मार्चनंतरही अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2017 12:25 AM2017-03-23T00:25:41+5:302017-03-23T00:25:41+5:30

जळगाव : जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प २१ मार्चपूर्वी मंजूर करायचा असतो, पण हा अर्थसंकल्प अजूनही अपूर्ण असून, त्याबाबत अद्यापही आकडेमोडच सुरू आहे.

Zip The budget is still incomplete after March 21 | जि.प. अर्थसंकल्प २१ मार्चनंतरही अपूर्ण

जि.प. अर्थसंकल्प २१ मार्चनंतरही अपूर्ण

googlenewsNext

जळगाव : जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प २१ मार्चपूर्वी मंजूर करायचा असतो, पण हा अर्थसंकल्प अजूनही अपूर्ण असून, त्याबाबत अद्यापही आकडेमोडच सुरू आहे.

यंदा जि.प. निवडणुकीची आचारसंहिता व इतर कारणे यामुळे जि.प.च्या प्रशासनाला अर्थसंकल्प मंजुरीचे अधिकार आहेत. नियमानुसार हा अर्थसंकल्प २१ मार्चपूर्वी प्रशासनाला मंजूर करायचा होता, पण अजूनही अर्थसंकल्प तयार झालेला नाही. शासकीय निर्देशांचे उल्लंघन यानिमित्त जि.प.मध्ये झाले आहे. २१ मार्चपूर्वी अर्थसंकल्प मंजूर करून तो नूतन सदस्यांसमोर अवलोकनार्थ सर्वसाधारण सभेमध्ये सादर करण्याचे निर्देश आहेत. सर्व विभागांच्या जमा व खर्चाची माहिती सीईओ यांच्याकडे सादर करण्यात आली आहे. पण अर्थसंकल्प अद्यापही तयार नाही.
जि.प.चे प्रशासन सध्या पंचायत राज कमिटी दौºयाच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांसाठी दिलेली प्रश्नावली व इतर माहिती संकलित करीत आहे. १८, १९ व १२ एप्रिल रोजी २३ आमदार यांचा सहभाग असलेली पंचायत राज कमिटी जि.प.मध्ये येणार आहे. आतापर्यंत तीन विभागांची प्रश्नावलीबाबत तयारी झाली आहे.

Web Title: Zip The budget is still incomplete after March 21

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.